Join us

‘त्या’ १,०५८ उमेदवारांना एसटीत सामावून घेणार: भरत गोगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:13 AM

भरतीमध्ये निवड झाल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरतीमधील प्रतीक्षा यादीवरील ३३७ उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या २०१९ मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीतील अतिरिक्त यादीवरील एकूण १,०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. 

भरतीमध्ये निवड झाल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरतीमधील प्रतीक्षा यादीवरील ३३७ उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकता व रिक्त जागांनुसार सामावून  घेतले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या उमेदवारांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना गोगावले यांनी दिल्या होत्या.  

टॅग्स :एसटी