मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी संघटनेत काम करण्याची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकमत डॉट कॉमवर दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रीया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष झाल्यानंतर खासदार सुळे यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली. लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली.
'मग त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी ‘ म्हणायचे का ? चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना सवाल
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला नवा प्रदेशाध्य येईल का नाही हे पक्ष ठरवेल, राष्ट्रवादी पक्ष हा दडपशाहीचा पक्ष नाही. पक्षाला अजितदादांना प्रदेशाध्यक्ष पद द्यायचे आहे की भुजबळ साहेबांना द्यायच यावर पक्षामध्ये सविस्तर चर्चा होणार. पक्षात जे काही निर्णय होतात ते सर्वांशी बोलून घेतले जातात. जस अजितदादांच ऐकल जाईल तसे छगन भुजबळ साहेबांचही ऐकले पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'पक्ष हा लोकशाहीने चालतो. त्यामुळे सर्वांच ऐकलं पाहिजे. मी स्वत:ला शरद पवार यांचा वारसदार समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा मला जी जबाबदारी देईल तेव्हा ती जबाबदारी मी १०० टक्के वेळ देऊन पूर्ण करेन. मी पक्षाला रिझल्ट द्यायचा मी प्रयत्न करेन. मी पवार साहेबांची वारसदार आहे असं मी समजत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे सामना असं दहा जन्मात होणार नाही. कारण दादा माझा मोठा भाऊ आणि नेता आहे. माझ्यावर आणि दादावर जे संस्कार झाले आहेत ते पदासाठी नाही तर आम्ही दोघ राजकारणात बदल घडवण्यासाठी आलो आहोत. हे फक्त दादाचं आणि माझं नाही तर राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल हेच माझ्या मनात आहे, असंही सुळे म्हणाल्या.