मुंबई- गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे राज्यात या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी मात्र आपण कुठेच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
देशहितासाठी राष्ट्रवादी भाजपासोबत येत असेल तर...; BJP मंत्र्यांचं मोठं विधान
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अंजली दमानिया यांनी हे मत मांडलं असेल. ते त्यांच वैयक्तिक मत असेल. त्या तुमच्याशी कुठे बोलल्या माहित नाही. या चर्चा फक्त माध्यमात आहेत. मी गॉसीमध्ये लक्ष देत नाही, आम्हाला मतदार संघात काम करायच आहे, त्यामुळेच आम्हाला गॉसीप करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. असंही सुळे म्हणाल्या.
आपल नानं ५५ वर्ष मार्केटमध्ये टीक आहे याचाच मला अभिमान वाटत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दादा कुठेही जाणार नाहीत: एकनाथ खडसे
अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली. 'माझं अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. दादा कुठेही जाणार नाहीत. त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. अंजली दमानिया यांनी मंत्रालयातील एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "आज मी कामानिमित्त मंत्रालयात गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवून एक रंजक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, १५ आमदार आणि अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत, असं ट्विट केले आहे. या ट्विटवरुन आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.