अर्णब गोस्वामी आणि कंगनाच्या मालमत्तेची चौकशी होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:04 AM2020-12-09T04:04:21+5:302020-12-09T04:04:21+5:30
प्रताप सरनाईक अर्णब गोस्वामींसह कंगनाच्या मालमत्तेची चौकशी होणार का? प्रताप सरनाईक : भाजपवर साधला निशाणा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
प्रताप सरनाईक
अर्णब गोस्वामींसह कंगनाच्या मालमत्तेची चौकशी होणार का?
प्रताप सरनाईक : भाजपवर साधला निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमएमआरडीएच्या सुरक्षा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमवारी विलगीकरणातून बाहेर पडल्यानंतर दादर येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तसेच कुठल्याही गैरव्यवहारात आपला सहभाग नसून, रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनाैतच्या मालमत्तेची चौकशी होणार का? असा सवाल करीत भाजपवर निशाणा साधला.
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेल्या अमित चांडोळे याच्या चौकशीतून एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षक घोटाळ्यातील नफ्याच्या रकमेत सरनाईक यांचा ५० टक्के वाटा असल्याची माहिती समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे. अशातच टॉप्स ग्रुप आणि विहंग यांच्यातील व्यवहार तपासण्यासाठी सरनाईक पितापुत्रांना समन्स बजाविण्यात आले. मात्र सरनाईक यांनी विलगीकरणात असल्याचे कारण पुढे करीत, आठवड्याभराने चौकशी करण्याची विनंती केली. तर मुलगा विहंग यांनीही पत्नी आजारी असल्याने चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली.
अखेर दोन आठवड्यांनी सरनाईक पिता-पुत्र सर्वांच्या समोर आले. मंगळवारी सरनाईक हे सहकुटुंब दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेेले हाेते. आपल्यावरील ईडीची इडापीडा टळो म्हणून बाप्पाकडे पार्थना केल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ईडीकडून नोटिसा आलेल्या आहेत. त्यावर वेळोवेळी उत्तरे देण्यात आली आहेत. ईडीच्या तपासाला सहकार्य करणार आहे. मी केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामधील तानाजी मालुसरे असल्याची प्रतिक्रिया सरनाईक यांनी दिली.
* ‘हजारो कोटींची मालमत्ता आली कुठून?’
भाजपचे मंगल प्रभात लोढा, पराग शहा तसेच पश्चिम बंगालमधून आलेले गोस्वामी यांच्या मालमत्तेची चौकशी होणार का? गोस्वामी यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे? ती कुठून व कशी आली? काल-परवा मुंबईत आलेल्या कंगनाकडे एवढी मालमत्ता कशी? या सर्वांसह भाजपच्या नेते मंडळींची चौकशी होणार का? असे म्हणत सरनाईक यांनी भाजपवर निशाणा साधला.
..............................