मुंबई/सोलापूर - आपल्या वादग्रस्त नृत्यप्रकारामुळे सर्वप्रथम चर्चेतआलेली नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. आपल्या लावणी कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीच्या शोंचे आयोजन होत असून तरुण वर्गाची तिच्या कार्यक्रमाला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळेच, गौतमी जिथे जाईल तिथं गर्दी आणि वाद होताना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता, गौतमीने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांनी प्रश्न विचारले असता पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आल्याचे तिने सांगितले.
आषाढीची वारी सुरू होतेय, या भागात वारकऱ्यांसाठी एखादा कार्यक्रमा दाखवायची इच्छा आहे का असा प्रश्न गौतमी पाटीलला पत्रकाराने विचारला होता. त्यावर, नक्कीच.. पण सध्या तसा विचार केलेला नाही, असे गौतमी म्हटले. देवा, आशीर्वाद राहू दे अशी मागणी पांडुरंगाकडे केली. तसेच, आषाढी वारी येतेय, त्यासाठी काही एखादा कार्यक्रम दाखवणार का, असा प्रश्न केला असता, नक्कीच विचार करेल, अजून तसं काही नाही. आज या भागात माझा कार्यक्रम होता, त्यामुळी मी इथे दर्शनाला आले होते, असे गौतमीने म्हटले.
गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गौतमीचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर आयोजक आणि गौतमी यांच्यात वाद झाला. या वादाची पोलिसातही तक्रार करण्यात आली होती. तर, विविध ठिकाणी तिच्या कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याने तिच्यावर काही जणांकडून टीकाही करण्यात येत आहे. महाराष्ट्राचा छोटा पुढारी असलेल्या धनश्याम दरोडे यानेही गौतमीला, महाराष्ट्राचा बिहार करू नका, महाराष्ट्राची संस्कृती जपा,,, अशा शब्दात सुनावले होते. त्यावर, गौतमीनेही प्रत्युत्तर दिले होते.