आझमींची सायकल ‘डपिंग’चा चढ ओलांडून हॅटट्रिक साधणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 09:33 PM2019-08-25T21:33:46+5:302019-08-25T21:34:02+5:30

मानखुर्द- शिवाजीनगर मतदार संघ

Will Azmi's cycle cross hatch with 'dumping'? mumbai vidhan sabha election | आझमींची सायकल ‘डपिंग’चा चढ ओलांडून हॅटट्रिक साधणार ?

आझमींची सायकल ‘डपिंग’चा चढ ओलांडून हॅटट्रिक साधणार ?

Next

जमीर काझी

मुंबई : देवनार येथील डपिंग ग्राऊंडची दुर्गंधी आणि त्यामुळे स्थानिकांना उदभविणाऱ्या समस्या कायम असूनही समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा आणि विद्यमान आमदार अबू असीम आझमी मानखुर्द -शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून सलग तिसºयादा विजयाची पताका फडकावित हॅटट्रिक साधण्याच्या मार्गावर आहे. याठिकाणची प्रमुख समस्या कायम असतानाही सत्ताधारी सेना-भाजपासहित कॉँग्रेसकडेही त्यांच्या विरोधात सध्याच्या घडीला प्रबळ उमेदवार नाही आहे.

त्यामुळे महानगरासह राज्यभरातील मतदारसंघात भाजपा-सेनाचे वर्चस्व वाढले असताना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघ मात्र त्याला अपवाद राहिला असल्याची परिस्थिती आहे. गेल्या दहा वर्षापासून एकहाती वर्चस्व ठेवलेल्या अबू आझमी यांना यंदा कॉग्रेस- राष्टÑवादीचा पांठिबा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या मत विभागणीचा धोका टळल्यातच जमा आहे.
मध्यम, निम्न मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांची वस्ती असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम समाजाची एकगट्टा व निर्णायक आहेत. मतदार संघातील डंपिग ग्राउंडमुळे स्थानिकाच्या आरोग्याच्या समस्यामध्ये वाढ होत आहे. तो तेथून हलविण्याचा प्रयत्न आझमी यांनी विधीमंडळात व विधी मंडळाबाहेरही मोठ्या प्रमाणात केला आहे. मात्र रोज जमा होणारा हजारो टन कचºयाची विल्हेवाट लावणे व त्याचे पुर्नविघटन करण्याबाबत सबळ पर्याय मिळालेला नाही. त्यामुळे देवनारमधील डंपिग ग्राऊडवर रोज येणारा शेकडो टन कचऱ्यांची नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न कायम राहिला आहे. तीन-चार वर्षापूर्वी याठिकाणी लागलेल्या आगीमुळे काही निष्पाप जीवही गेले. त्यावर राजकारणही भरपूर झाले. गुन्हे शाखेकडून घटनेचा तपासही झाला. मात्र मूळ समस्या कायम राहिली आहे.

गेल्या निवडणूकीमध्ये अबू आझमींनी निर्विवाद वर्चस्व असल्याचे दाखवून देताना निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या सुरेश पाटील यांचा १० हजाराच्या मत्ताधिक्याने पराभव केला होता. कॉंग्रेसचे माजी आमदार अ‍ॅड. युसूफ अब्रानी यांनी ही लढत प्रतिष्ठेची करुनही तिसºया स्थानी राहिले होते. आझमी यांना ४१ हजार ७२० तर पाटील यांना ३१ हजार ७८२ मते मिळविली होती. तर अब्रानी यांना २७ हजार ४९४ मते मिळाली होती.

गेल्या पाच वर्षामध्ये बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. देशभरात गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसची याठिकाणीही बिकट अवस्था आहे.लोकसभा निवडणूकीत कॉँग्रेससह सपानेही सपाटून मार खाल्यामुळे विधानसभा निवडणूकीसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आझमी यांची उमेदवारी कायम राहिल. शिवाय माजी आमदार युसूफ अब्रानी यांनी मानखुर्द ऐवजी वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. एमआयएमकडेही याठिकाणी फारसा वाव नाही. त्याचप्रमाणे विरोधी शिवसेनेमध्येही अंतर्गत गटबाजी आहे. गेल्या वेळी निवडणूक लढविलेले पाटील हे संपर्कात नसल्याचा आरोप केला जात आहे.त्यामुळे यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल, या आशेने कॉँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी पंधरवड्यापूर्वीच मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले आहे. तिकिट मिळण्याच्या तडजोडीवरच त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले जात असलेतरी मूळ शिवसैनिकांत त्यांच्याबद्दलीची नाराजी कायम आहे. सत्ताधाºयांकडे प्रबळ प्रतिस्पर्धी नसणे, कॉँग्रेस राष्टÑवादीची सपाला साथ देण्याची मानसिकता, अल्पसंख्याकांची एकगट्टा मताच्या जोरावर अबू आझमी सायकलवर स्वार होवून सलग तिसºयादा विजयी होण्याची शक्यता दाट आहे.

 

Web Title: Will Azmi's cycle cross hatch with 'dumping'? mumbai vidhan sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.