भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा प्रकल्प रखडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 02:06 AM2019-11-16T02:06:07+5:302019-11-16T02:06:11+5:30

राणीबागीचे आरे कॉलनीत विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत राज्य सरकार आणि महापालिकेत सामंजस्य करारही झाला.

Will the Beykhla Zoo expand its expansion project? | भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा प्रकल्प रखडणार?

भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा प्रकल्प रखडणार?

Next

मुंबई : राणीबागीचे आरे कॉलनीत विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत राज्य सरकार आणि महापालिकेत सामंजस्य करारही झाला. मात्र, या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन, नियोजन कशाचीच माहिती पालिकेकडून मिळत नसल्याने पर्यावरणप्रेमींचे आंदोलन तीव्र होणार आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होताच, त्यांच्याकडे दाद मागण्याची तयारी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे, तर दुसरीकडे निधीअभावी हा प्रकल्प मागे पडण्याची शक्यता आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीची बाग) विस्तारासाठी गोरेगाव, पूर्व येथील आरे कॉलनीत शंभर एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. जून, २०१९ मध्ये जागेच्या हस्तांतरणाबाबत महापालिका आणि वनखात्यामध्ये सामंजस्य करारही झाला. या प्रकल्पासाठी आणखी १४० एकर जागा देण्याचे दुग्धविकास विभागाने मान्य केले. मात्र, मट्रो कारशेडप्रमाणे या प्रकल्पाविरोधातही पर्यावरणप्रेमींनी बंडाचा झेंडा फडकविला आहे.
या प्रकल्पाबाबत जाणून घेण्यासाठी जून, २०१९ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविण्यात आली होती. प्राणिसंग्रहालयासाठी कुठली जागा देणार? किती जागा बाधित होणार? या प्रकल्पाचा आराखडा अशा सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास पालिकेने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम वाढले आहे.
>निधीची कमतरता
आरे कॉलनीत प्रस्तावित प्राणिसंग्रहालयाच्या जमिनीसाठी लागणारा निधी आर्थिक मंदीमुळे महापालिकेला सध्या परवडणारा नाही. या प्रकल्पासाठी फारशा हालचाली
होताना दिसत नाही.
राणीबागेच्या नूतनीकरण प्रकल्पाचा हा पाचवा टप्पा असून, यासाठी सुमारे पाचशे कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र, सध्या हा प्रकल्प थंडावला असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
पाचशे कोटींच्या या प्रकल्पांतर्गत प्राणिसंग्रहालयात दुर्मीळ प्राणी आणले जाणार आहेत. जंगल सफारी हे या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्ट्य असणार आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या जागेसाठी
परवानगी दिल्याने प्राणिसंग्रहालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला होता.
>माहिती अधिकाराखाली मागविलेली माहितीही पालिकेने दिलेली नाही. या प्रकल्पाचा आराखडा अद्याप दाखविलेला नाही. प्रकल्पाची जागा, किती जागा बाधित होणार? कोणतीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होताच, त्यांच्याकडे दाद मागणार आहे.
- यश मारवाह, पर्यावरणप्रेमी.

Web Title: Will the Beykhla Zoo expand its expansion project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.