कॅगचा ठपका असणाऱ्यांना भाजपा स्वीकारणार का?

By admin | Published: September 22, 2014 11:34 PM2014-09-22T23:34:03+5:302014-09-22T23:34:03+5:30

सिडकोने दिलेली वाढीव जमीन तसेच कळंबोली येथील पार्किंगकरिता टीआयपीएलला कवडीमोल भावात देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे

Will the BJP accept CAG's blame? | कॅगचा ठपका असणाऱ्यांना भाजपा स्वीकारणार का?

कॅगचा ठपका असणाऱ्यांना भाजपा स्वीकारणार का?

Next

पनवेल : उलवे येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सकरिता सिडकोने दिलेली वाढीव जमीन तसेच कळंबोली येथील पार्किंगकरिता टीआयपीएलला कवडीमोल भावात देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या विरूध्द लढणारे भाजपा नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडवणीस अशा भ्रष्टाचाऱ्यांना भाजपामध्ये प्रवेश देणार, असा प्रश्न आमदार विवेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार विवेक पाटील बोलत होते. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळाराम पाटील, शेकापचे राज्य प्रवक्ते मल्लिनाथ गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, तालुका चिटणीस नारायणशेठ घरत उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसच्या सत्तेचा गैरवापर करून उलवा येथील स्वत:च्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी नियमबाह्य मंजुरी मिळविली व कवडीमोल भावात भूखंड मिळविला. यासंदर्भात कॅगच्या अहवालामध्ये ठपका देखील ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे कॅगच्या अहवालात कळंबोली स्टील मार्केटमध्ये सत्तेच्या माध्यमातून अतिशय कमी दरामध्ये पार्किंगचे कंत्राट मिळविले आहे.
सिडकोच्या कोट्यवधींचा तोटा करून स्वत:च्या टीआयपीएल कंपनीला २० वर्षात २०८ कोटी १४ लाख रूपयांचा मलिदा कमावण्याचे काम ठाकूर यांनी सत्तेच्या माध्यमातून केले. याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

Web Title: Will the BJP accept CAG's blame?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.