भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:30 PM2021-12-30T17:30:22+5:302021-12-30T17:51:11+5:30

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी-पवार भेट, शिवसेना, परीक्षा घोटाळे यांसह अनेक भाष्य केलं

Will BJP-Shiv Sena come together again ?, Chandrakant Patil made it clear | भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Next
ठळक मुद्देगेल्या 26 महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जो इतिहास आहे, अडकविण्याचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या आमदारांना द्यायचा हा जो इतिहास आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे," असं म्हणत शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलं. बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. पवार यांच्या या विधानानंतर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पाटील यांनी भाष्य करण्याइतका मोठा नेता आपण नसल्याचं म्हटलंय. तर, भाजपा-शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर स्पष्टचं उत्तर दिलंय. 

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी-पवार भेट, शिवसेना, परीक्षा घोटाळे यांसह अनेक भाष्य केलं. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय. 

''गेल्या 26 महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा जो इतिहास आहे, अडकविण्याचा इतिहास आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या आमदारांना द्यायचा हा जो इतिहास आहे. तसेच, महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा जो इतिहास आहे, तो पाहता. यांच्यासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी इच्छा नाही, अर्थात केंद्रीय नेतृत्त्व ते ठरवेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. 

मी इतका मोठा नेता नाही - पाटील

नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्यात झालेली चर्चा आपल्याला कळनेच अवघड आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य करण्याचे टाळले. मात्र, राज्याच्या राजकारणात आता सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत कोण जाणार, याची चढाओढ राजकीय पक्षात चाललीय, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला. 

राज्यातील भाजप-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालेलं, यास आपण सहमती दिली नसल्याचं पवार यांनी सांगितलं. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार आणि नरेंद्र मोदी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवी, अमित शहा आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली हे सांगण्याइतका मी मोठा नेता नाही, असे पाटील यांनी म्हटले. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून जे चाललंय ते याच चढाओढीचा परिणाम आहे. कोण बाहेर पडणार आणि भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन करणार, याची चढाओढ लागल्याचं पाटील यांनी म्हटलं. भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेत नाही, आमची 9 जणांची कोअर कमिटी आहे, ती कमिटी निर्णय घेते, असेही पाटील यांनी सांगितले. 
 

Web Title: Will BJP-Shiv Sena come together again ?, Chandrakant Patil made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.