२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युतीतून बाहेर पडले. यानंतर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी सुरू केली. यानंतर शिवसेनेत उभी फूट पडून दोन गट पडले यातला एक गट भाजपसोबत गेला. दरम्यान, देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांनी अनेक दिग्गज नेते भाजपसोबत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत महायुतीत येतील का अशा चर्चा सुरू आहेत. यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतील उत्तर दिले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत शाह यांना उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत घेणार का असा प्रश्न उपस्थित केली. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, जर तर ला अर्थ नाही, तुम्हाला काही हेडिंग मिळणार नाही. तुम्ही उगाच वेळ वाया घालवताय.
मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा
अमित शाह म्हणाले, मी पक्षाच्या सिद्धांतावर काम करतो. आमचा पक्ष अनेक पराभव सहन करुन पुढे आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विजयाची सवय लागली आहे. इंडिया आघाडी कधीच झाली नव्हती. इंडिया आघाडीतील उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत. एका सिद्धांतावर काम केल्यानंतर आघाडी होऊ शकते. या आघाडीत फक्त एकमेकांच्या मुलालाच मोठे करणे आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.
अमित शाह म्हणाले, विरोधकांची आघाडी ही फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली आहे. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं यासाठी एकत्रित आले आहेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलाने मुख्यमंत्री बनावं हे उद्धव ठाकरेंचं लक्ष्य आहे. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे.