भाजपचा माजी नगरसेवक घेऊन शिंदे सेना 'अंधेरी पूर्व' लढवणार? ठाकरे सेनेविरोधात या नावाची चर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: October 19, 2024 01:50 PM2024-10-19T13:50:20+5:302024-10-19T14:03:44+5:30
न्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहे. तशी पी.एस.फाउंडेशन मधून गणपती पासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदार संघात बॅनरबाजी देखील केली होती.
मुंबई-अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उद्धव सेनेच्या मशाल चिन्हावर ऋतुजा लटके विजयी झाल्या होत्या. तर ही जागा शिंदे सेनेकडे असून त्यांच्या विरोधात शिंदे सेनेतून भाजपाचे माजी नगरसेवक मुरजी पटेल हे शिंदे सेनेतून येथून लढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.
या मतदार संघातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहे. तशी पी.एस.फाउंडेशन मधून गणपती पासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदार संघात बॅनरबाजी देखील केली होती. ही जागा शिंदे सेनेची असल्याने भाजपाला ही जागा हवी असली तरी त्यांना मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे उद्धव सेनेच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी मुरजी पटेल यांना शिंदे सेनेतून तिकीट मिळू शकेल माहिती सूत्रांनी दिली.
कृतिका शर्मा या जरी येथून इच्छुक असल्या तरी त्यांचा तसा राजकारणात अनुभव नाही. तर काका या नावाने अंधेरी पूर्व भागात दांडगा संपर्क असलेले मुरजी पटेल हे शिंदे सेनेतून अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.