Join us

बेस्ट कामगारांच्या पगारातून ‘बोनस’ कापून घेणार? सत्ताधारी शिवसेना चिडीचूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 5:13 AM

बेस्ट उपक्रमावर प्रशासक नेमण्याचा विचार पुढे आला असताना आता कर्मचाºयांना दिवाळीत दिलेल्या बोनसची रक्कमही त्यांच्या पगारातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज माहितीसाठी सादर करण्यात आला होता.

मुंबई : बेस्ट उपक्रमावर प्रशासक नेमण्याचा विचार पुढे आला असताना आता कर्मचाºयांना दिवाळीत दिलेल्या बोनसची रक्कमही त्यांच्या पगारातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज माहितीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र सत्ताधारी शिवसेनेने यावर कोणताही आक्षेप न घेता या प्रस्तावाला मूक संमतीच दिली. तर विरोधकांनी त्यापूर्वीच सभात्याग केला होता. त्यामुळे बेस्ट कर्मचाºयांना बोनस म्हणून दिलेली रक्कम जानेवारीपासून ११ महिन्यांत कर्मचाºयांच्या पगारातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे.आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला कर्मचाºयांचे पगार देणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने बोनससाठी २१.६४ कोटी आगाऊ रक्कम बेस्टला दिली होती. त्यातूनच कर्मचाºयांना साडेपाच हजार रुपये बोनस मिळाला होता. पालिका प्रशासनाने सुचवलेल्या सुधारणांची प्रक्रिया सुरू केल्यास ही रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून गणली जाईल, अन्यथा ती अधिकारी व कर्मचाºयांच्या पगारातून ११ हप्त्यांत वसूल केली जाईल, अशी जाचक अट पालिका आयुक्तांनी त्या वेळी घातली होती. त्यानंतर बेस्ट समितीने सुधारणांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कामगार संघटना आणि अधिकाºयांच्या बैठका घेऊन पालिका प्रशासनाने सुचवलेला कृती आराखडा मंजूर केला. तरीही जानेवारी २०१८मध्ये मिळणाºया वेतनातून रक्कम कापण्याचे संकेत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. बेस्ट कर्मचाºयांच्या सानुग्रह अनुदानाबाबतची माहिती स्थायी समितीला सादर करताना असा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.सुधारणा प्रकिया सुरू न झाल्यास जानेवारीपासून कामगारांच्या वेतनातून समान ११ हप्त्यांत वसुली केली जाईल, असे बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी पत्राद्वारे कळवल्याचे पालिका आयुक्तांनी बुधवारी स्थायी समितीपुढे मांडले. कामगारांना बोनस स्वरूपात दिलेले साडेपाच हजार रुपये पगारातून वसूल करू नयेत, अशी विनंती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी आयुक्तांना केली होती. मात्र शिवसेनेच्या एकाही सदस्याने या प्रस्तावावर स्थायी समितीत आक्षेप न घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतआहे.८२ टक्के सुधारणा बेस्टने केल्या मंजूरपालिका आयुक्तांनी घातलेल्या अटीनुसार सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुक्तांनी सुचवलेल्या कृती आराखड्यातील तब्बल ८२ टक्के सुधारणा समितीने मंजूर केल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षात बेस्टचे ५०४ कोटी रुपये वाचणार आहेत. नुकत्याच मंजूर झालेल्या बजेटमध्ये बोनससाठी २१ कोटींची तरतूद केली आहे. मग पगारातून रक्कम कापून कशी घेता येईल, असा सवाल बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केला.पालिकेने बेस्टला दिलेल्या १६०० कोटींच्या कर्जाचा दरमहा ४० कोटींचा हप्ता बेस्टतर्फे भरला जातो. नोव्हेंबर महिन्यातील हप्त्यातून २१.६४ कोटी रुपये वगळून त्यातूनच हे सानुग्रह अनुदान दिले गेले.

 

टॅग्स :बेस्टमुंबई महानगरपालिकाशिवसेना