ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:53 PM2020-11-17T17:53:45+5:302020-11-17T17:54:17+5:30

energy minister : वीज बिलांत सवलत देणार नाही असे सांगून खोटं बोलणाऱ्या...

Will bring a breach of rights against the energy minister | ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार 

ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार 

Next


मुंबई : कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी संगितले. 

भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव तयार झाल्याचेही व अर्थ खात्याबरोबर बैठक झाली असेही संगितले व राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढच्या आठवड्यात प्रस्ताव आणला जाणार असे जाहीर करून आज घुमजाव केल्याबद्दल विधानसभेच्या आगामी अधिवेशनात ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही" हे ऊर्जा मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे केवळ बेशरमपणा नसून खोटारडेपणाचा कळस अशी घणाघाती टीका ही आमदार भातखळकर यांनी केली आहे.

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही व वीज बिल भरले नसल्यास तात्काळ वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील एका एसटी कर्मचार्याणने आत्महत्या केल्यानंतर या सरकारला जाग आली, असे अजून किती जीव हे सरकार घेणार आहे? त्यामुळे आता या बेशरम सरकारला 1000 वॉल्टचे शॉक देण्याची आवश्यकता आहे अशी टीका त्यांनी केली. 

भारतीय जनता पार्टीने आंदोलन केल्यानंतर वीज बिलामध्ये सवलत देण्याच्या निर्णयाच नाटक या सरकारने केल आहे, पण अखेर या सरकारचा खोटा चेहरा जनतेसमोर आला आहे.  सरकारच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि या सरकारला वीज बिलामध्ये सवलत द्यायला भाग पाडेल असा इशाराही आमदार भातखळकर यांनी दिला.
 

Web Title: Will bring a breach of rights against the energy minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.