दिपक मोहिते ल्ल वसई
बोईसर मतदारसंघाचे विद्यमाने आमदार विलास तरे यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या विविध विकासकामांमुळे यंदाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक विकासनिधीमधून गावपाडय़ातील रस्ते, पाणीपुरवठा, समाजमंदिरे, जेटी व संरक्षक बंधारे इ. कामे मोठय़ा प्रमाणात केली. त्यांच्या मतदारसंघात औद्योगिकक्षेत्र मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे या क्षेत्रतील प्रश्नही त्यांनी आपल्या कार्यकालात मार्गी लावले. बोईसरचा पूर्व भाग हा आदिवासी बहुल असून गेली अनेक वष्रे येथील जनता विकासापासून वंचित होती. आ. तरे यांनी निवडून आल्यानंतर महामार्गालगत असलेल्या आदिवासीपाडय़ांवर दिवाबत्ती, पाणी व अंगणवाडय़ा इ. नागरीसुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे आदिवासी जनतेला दिलासा मिळू शकला.
गेल्या 5 वर्षात त्यांना मिळालेल्या आमदार निधीचा वापर त्यांनी आदिवासी बहुल असलेल्या परिसरात विकासकामांसाठी केला. त्यामुळे आदिवासी पाडय़ांवर रस्त्याचे जाळे विणले गेले. तसेच अतिग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रय} केले व त्यास पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक जिल्हापरिषदेच्या शाळांची डागडुजी केली त्यामुळे विद्याथ्र्याना दिलासा मिळू शकला. पुर्वी शाळांच्या वास्तू कोसळण्याच्या स्थितीत होत्या त्यांनी डागडुजी करून त्यांना सुस्थितीत आणले. आज बोईसरच्या ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. अंगणवाडय़ांमधून कुपोषीत बालकांना देण्यात येणा:या पोषण आहाराच्या वाटपातील गैरप्रकार रोखण्यासंदर्भात त्यांनी कडक धोरण अवलंबून कारवाई केली त्याचे दृष्यपरिणाम आता पहावयास मिळत आहेत.
वर्षानुवष्रे पाणीटंचाईमध्ये होरपळणा:या जनतेला दिलासा मिळावा याकरीता आ. तरे यांनी पाडय़ापाडय़ावर बोअरींग, दशलक्ष विहिर योजनेअंतर्गत विहिरी बांधणो, कोल्हापूर बंधारे उभारणो याकामी जातीने लक्ष घातले. त्यामुळे अतिग्रामीण भागातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले अनेक गैरप्रकार त्यांनी रोखले. पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा साठा नसणो, कर्मचा:यांची गैरहजेरी व रुग्णांसमवेत उद्दाम वर्तन यामुळे सर्वसाधारण रुग्ण उपचारासाठी आरोग्य केंद्रात जात नसत. परंतु आ. तरे यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिका:यांना फैलावर घेऊन आरोग्यकेंद्रातील प्रशासकीय कामकाजात सुधारणा केली. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता योग्य प्रमाणात सोयी-सुविधा रुग्णांना उपलब्ध होत आहेत. अन्नधान्य पुरवठय़ासंदर्भातही मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार होत असत. शासकीय गोदामातून निघालेले धान्य थेट काळय़ाबाजारात विक्रीसाठी जात असे. त्यासंदर्भातही आ. तरे यांनी जातीने लक्ष घातले व व्यवस्थेत सुधारणा झाली. दारिद्र रेषेखालील कुटुंबांना ठरवून देण्यात आलेला धान्याचा कोटा पूर्वी मिळत नव्हता परंतु आ. तरे यांनी यंत्रणोतील त्रुटी दुर करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले व ही व्यवस्था आता योग्य पद्धतीने कार्यान्वित झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रत सुरू असलेल्या कंत्रटी पद्धतीमधील कामगारांना योग्य तो न्याय मिळत नव्हता. याबाबत आ. तरे यांनी कामगार उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून यातील गैरप्रकार दूर करण्यास भाग पाडले. त्यामुळे कंत्रटी पद्धतीतील कामगारांना काही प्रमाणात संरक्षण मिळाले. उद्योजकांच्याही अडचणीसंदर्भात आ. तरे यांनी महावितरण, कामगार उपायुक्त, औद्योगिक सुरक्षा व अन्य विभागाच्या अधिका:यांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रय} केला.