"मुख्यमंत्री शिंदे अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्याचे धाडस दाखवणार का?"

By मनोहर कुंभेजकर | Published: October 14, 2023 08:54 PM2023-10-14T20:54:07+5:302023-10-14T20:55:06+5:30

रहिवासी नागरिकांचा संतप्त प्रश्न

"Will Chief Minister Shinde dare to inspect dangerous buildings?" Citizens' angry question | "मुख्यमंत्री शिंदे अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्याचे धाडस दाखवणार का?"

"मुख्यमंत्री शिंदे अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्याचे धाडस दाखवणार का?"

मनोहर कुंभेजकर, मुंबई: अंधेरीतील पूर्वेतील पी.एम.जी.पी इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील बालकानीचा स्लॅब कोसळण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्यामुळे येथील रहीवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येथील शिल्पग्राम उद्यान येथे उद्या महापालिकेच्या एका कार्यक्रमासाठी येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अती धोकादायक पीएमजीपी इमारतीत जीव मुठीत घेऊन राहणार्‍या ९९४ कुटुंबाचे दुख ऐकण्यासाठी व इमारतीची पाहणी करण्यासाठी येण्याचे धाडस दाखवणार का, असा संतप्त प्रश्न येथील रहिवासी विचारत आहे.

शुक्रवारी दर्शन को. ऑप. सोसायटी ७ नंबर बिल्डिंग मधील रूम नंबर ८ पहिल्या माळ्यावर राहणारे ज्येष्ठ नागरिक मॅरी अथणी यांच्या मागील बाजूचा बाल्कनीचा मोठा भाग कोसळण्याची घटना घडली यात ते थोडक्यात बचावले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धोकादायक इमारतीतील रहिवाशी भीतीच्या छत्रछायेखाली आपल आयुष्य जगत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार रविंद्र वायकर व माजी नगरसेवक अनंत नर यांनी इमारतीची पाहणी केली. वायकर यांनी विधानसभेत अनेक वेळा लक्षवेधी, तारांकीत प्रश्न, औचित्याचा मुद्दा, अर्धातास चर्चा एम.जी.पी इमारतीच्या पुनर्विकासाबाबत प्रश्न मांडला. अनेक बैठका मुख्यमंत्री व म्हाडा सीईओ यांच्या समवेत घेण्यात आल्या. 

पीएमजीपी वसाहतीतील हजारो राहिवाशांचा जीव पुनर्विकास रखडल्यामुळे टांगणीला लागला आहे. किती वर्ष आम्ही मरणयातना सहन करायच्या असा प्रश्न राहिवाशांना पडला आहे. पी.एम.जी.पी वसाहती मधील १७ इमारतीतील ९९४ कुटुंब सध्या भीतीच्या छत्रछायेत वास्तव्य करत आहेत. येथील अनेक इमारतीना टेकू लावण्यात आला आहे. अनेक इमारती धोकादायक स्वरूपात असल्यामुळे कधीही कोसळण्याची व  धोकादायक इमारतीती झाल्यामुळे राहिवाशाना स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

मागील १६ वर्षापासून पुनर्विकास रखडला आहे. घरातील स्लॅब व छताचा भाग कोसळणे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे राहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. वसाहतीतील १७ इमारतीचा देखभाल म्हाडा मार्फत वेळोवेळी करण्यात येत नसल्यामुळे इमारत जीर्ण अवस्थेत आहे. या इमारती २५ ते ३० वर्षे जुन्या आहेत. वसाहतीतील सर्व इमारतीत लीकेज, स्लब कोसळणे, प्लास्टर निघणे, टेरेसची पडझड होणे अशा घटना वारंवार घडतात.

मागील पाच वर्षात स्लॅब व प्लास्टर कोसळण्याच्या १५ ते १८ घटना

 २०२२ मध्ये मे महिन्यात पी.एम.जी.पी वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक नंबर १६, रूम नंबर ५८ घर मालक प्रकाश तुकाराम थोरात यांच्या घरातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. त्यावेळी प्रकाश यांच्या पत्नी स्मिता थोरात आणि दोन मुलं घरात होती. किचन मध्ये स्मिता काम करत असताना अचानक रूममधील स्लॅब खाली कोसळला. दोन मुलं आणि स्मिता या थोडक्यात बचावल्या. 

 प्रियदर्शनी को.ऑप. हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नं. २, रूम नंबर २९ रहिवाशी कृष्णा पिंगुलकर यांच्या किचन मधील स्लॅब कोसळण्याची घटना १ एप्रिलला घडली.

बिल्डिंग क्रमांक १ मधील ३ ऱ्या माळ्यावरील एका घराचे संपूर्ण छत १८ एप्रिलला कोसळण्याची गंभीर घटना घडली. या घटनेत घरातील महिलेसह इतर सदस्य सुदैवाने बचावले. बिल्डिंग नंबर १, रूम नंबर ४६ सुरेशचंद्र राठोड यांच्या घराचा स्लॅब कोसळला. घरातील छताचा भाग कोसळला त्यादरम्यान सिलेंडरचा स्फोट होतो, तसा मोठा आवाज आल्यामुळे घरातील राहिवाशांसह इमारतील रहिवाशी धास्तावले आहेत.

Web Title: "Will Chief Minister Shinde dare to inspect dangerous buildings?" Citizens' angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.