Join us

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिराच्या भूमिपूजनाला उपस्थित राहणार? लवकरच भूमिका जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 2:14 PM

या भव्यदिव्य कार्यक्रमाला जवळपास ३०० जणांना आमंत्रण पाठवण्यात येईल. ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही समावेश असेल.

ठळक मुद्देराम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी टोला लगावला होतामागील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला राम मंदिराच्या निर्माणासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती

अयोध्या – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. अद्याप उद्धव ठाकरेंना अयोध्येला येण्याचं अधिकृत आमंत्रण मिळालं नसलं तरी लवकरच त्यांना आमंत्रण पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निमंत्रणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या सूत्रांनुसार सोमवारी संध्याकाळपर्यंत याबाबत पक्षात चर्चा केली जाईल. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. उद्धव यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्री बनल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊन रामाचं दर्शन घेतलं होतं. राम मंदिराच्या निर्माणासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती. गेल्या ३ दशकापासून शिवसेना आणि राम मंदिराचं भावनिक नातं आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची अयोध्येतील आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती, त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमंत्रण पाठवलं जाईल असं सांगण्यात येत आहे.

या भव्यदिव्य कार्यक्रमाला जवळपास ३०० जणांना आमंत्रण पाठवण्यात येईल. ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचाही समावेश असेल. त्यासोबत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे. या यादीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा समावेश आहे.

भूमिपूजन कार्यक्रम

अयोध्येतील पुजाऱ्यांनी प्रभू राम जन्मभूमीवर ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वैदिक मंत्रोच्चारासोबत संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली आहे. ४ ऑगस्टला रामचर्य पूजा आणि ५ ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. दुपारी १२.१५च्या सुमारास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शरद पवार यांची टीका  

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी टोला लगावला होता. काही लोकांनी वाटतेय की राम मंदिरामुळे कोरोना बरा होईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे हे त्यांनी ठरवायला हवे. सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवे. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवे. कदाचित राम मंदिरामुळे कोरोना जाईल असे त्यांना वाटत असावे. कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्था खचली आहे. त्यावर मोदींनी लक्ष द्यावे, असे मला वाटत असल्याचे पवार म्हणाले. आपले खासदार याबाबत जिथे गरजेचे आहे तिथे सरकारचे लक्ष वेधतील असंही पवार यांनी सांगितलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...

 ‘या’ ठिकाणी कोरोना लसीच्या अंतिम टप्प्याची चाचणी सुरु; लवकरच लोकांना उपलब्ध होणार

आजपासून ग्राहकांना मिळणार 'हे' नवीन अधिकार; दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांना चाप बसणार

प्रियंका गांधींची शिष्टाई यशस्वी होणार?; सचिन पायलटांचं विमान माघारी परतणार

चीनमध्ये लाखो लहान मुलं बेपत्ता; पाणी बॉटलच्या मदतीनं आई-वडील घेतायेत चिमुकल्यांचा शोध

टॅग्स :उद्धव ठाकरेराम मंदिरअयोध्याशरद पवार