आजारपणातून लवकरच बाहेर येईन- ऋषी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:15 AM2019-01-28T05:15:16+5:302019-01-28T05:15:36+5:30

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच खुद्द ऋषी यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

Will come out soon due to illness: Rishi Kapoor | आजारपणातून लवकरच बाहेर येईन- ऋषी कपूर

आजारपणातून लवकरच बाहेर येईन- ऋषी कपूर

Next

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजारपणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच खुद्द ऋषी यांनीच याबाबत खुलासा केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘माझ्या तब्येतीत आधीपेक्षा बरीच सुधारणा आहे. मी आणखी काही दिवस कामावर परतू शकणार नाही. उपचार अद्यापही सुरू आहेत. या आजारपणातून मी लवकरच बाहेर येईन, अशी आशा करतो. परमेश्वराची कृपा राहिली तर लवकरच कामावरही परतेन.’

उपचार पद्धतीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘माझ्यावर सुरू असलेला उपचार प्रचंड थकवणारा आणि दीर्घकाळ चालणारा आहे. यासाठी संयम लागतो आणि दुर्दैवाने माझ्या स्वभावात तोच नाही.’ गेल्या काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याची चर्चा माध्यमांत सुरू होती. मात्र, कपूर कुटुंबाने ही अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. परंतु, नीतू कपूर यांनी नववर्षानिमित्त केलेल्या एका पोस्टनंतर पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, ‘नव्या वर्षात प्रदूषण कमी होऊ दे. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेच नाव असेल.’ नीतू सिंग यांची ही पोस्ट वाचून ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही ना, असा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडला होता.

Web Title: Will come out soon due to illness: Rishi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.