मुंबई : सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी विदर्भ, मराठवाड्यात येत असून यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
खरीप हंगामातील सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे लाखो शेतकऱ्यांवर यंदा दुबार पेरणीचे संकट आले. कंपन्यांच्या बोगस बियाणांमुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील एका शेतकºयाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हानिहाय आढावा घेऊन ‘बियाणे कंपन्यांवर कारवाई कधी?’ असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी या वृत्ताची दखल घेतली.काळजी घेणारे सरकारमुख्यमंत्री म्हणाले, आपलं ‘काळजीवाहू’ सरकार नसून सर्वांची काळजी घेणारं सरकार आहे. ज्यांनी शेतकºयांना फसवलेले आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. शिवाय, शेतकºयांचे ज्यांनी नुकसान केले त्यांच्याकडून नुकसान भरपाईही मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने ती आणखी ३ महिन्यांसाठी वाढवून देण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा फायदा घेण्यापासून स्थानिक निवडणुका, त्यानंतर करोनाच्या संकटामुळे काही लाख शेतकरी वंचित राहिले आहेत. मात्र, आता या उरलेल्या शेतकºयांनाही कर्जमुक्त करायचे आपण ठरवलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.