Join us

पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 2:47 AM

आयआयटीचा चिंता वाढवणारा रिसर्च : आर्द्र वातावरणात कोरोनाचे अस्तित्व ५ पटीने अधिक

मुंबई : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच काळजी वाढवणारा एक रिसर्च समोर आला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांच्या कनेक्शनबाबत एक नवी माहिती रिसर्चमधून पुढे आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (ककळ) मुंबईने कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदल यांचा अभ्यास केला. यामध्ये आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात राहू शकतो असंम्हटलं आहे. आयआयटीने केलेल्या रिसर्चमध्ये पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याची शक्यता असल्याचे देखील नोंदवण्यात आले आहे.

आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोना व्हायरसवर अभ्यास केला आहे. दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास केला. ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील ६ शहरांमध्ये दररोज होणाºया संसर्गाची तुलना केली. रजनीश भारद्वाज यांनी कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात विषाणूचा अस्तित्वदर ५ पट जास्त असल्याची माहिती दिली आहे.मुंबईत लवकरच मान्सून धडकणार आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत कोरोनाचा धोकाअधिक आहे. पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिकअसते. अशा परिस्थितीतपावसाळ्यात कोरोना संसर्गहोण्याचे प्रमाण जास्त वेगानेवाढू शकतो.मुंबई, केरळ, गोव्यात स्थिती बिकट होणार?च्प्राध्यापक अमित अग्रवाल यांनी जर आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त काळ टिकून राहिला, तर मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत येणाºया काळात परिस्थिती आणखी बिकट होईल.च्आयआयटीच्या प्राध्यापकांनी केलेल्या या अभ्यासाशी अनेक डॉक्टर्स सहमत नाहीत. एका हिंदी वेबसाइटने याबाबतची माहिती दिली आहे.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या