Join us

मेट्रो तीनचा खर्च दीड पटीने वाढणार ? विलंबाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 3:31 AM

२०१३ साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. कारशेडच्या जागेतील संभाव्य बदल आणि त्यामुळे प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे धावण्यास होणारा विलंब यामुळे या प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटींपर्यंत वाढू शकतो.

मुंबई : आरे कारशेडच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो तीन या प्रकल्पाच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे खर्चात दीड पट वाढ होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१३ साली या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. कारशेडच्या जागेतील संभाव्य बदल आणि त्यामुळे प्रत्यक्ष मेट्रो रेल्वे धावण्यास होणारा विलंब यामुळे या प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटींपर्यंत वाढू शकतो. प्रकल्पाबाबतचा वाद, नियोजनातले बदल आणि कोरोनामुळे दाखल झालेली आर्थिक मंदी यामुळे या प्रकल्पाच्या वाढीव खर्चाचे नियोजन करण्याचे आव्हानही उभे ठाकणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे.केंद्र सरकारने १८ जुलै, २०१३ रोजी या मेट्रो मार्गिकेला मंजुरी दिली. त्यानंतर २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्याकडून १३ हजार २२५ कोटी रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करण्याचा करार झाला. तर, उर्वरित निधी केंद्र सरकार, राज्य सरकार, एमएमआरडीए यांच्याकडून समभाग व दुय्यम कर्ज निधी स्वरूपात उपलब्ध होत आहे. कारशेड वगळता या मार्गिकेचे काम निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू आहे.स्पष्ट आदेशाची प्रतीक्षाआरे येथील ६०० एकर जमीन राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. परंतु, ते क्षेत्र नेमके कोणते, कारशेडचा १६७ एकरचा परिसर त्यात आहे का, आरे कारशेड रद्द करण्याच्या मागणीबाबत सरकार संवेदनशील असले तरी कारशेडला नक्की कोणती जागा दिली जाणार आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. सरकारने आपली भूमिका एकदा स्पष्ट केली तर पुढील दिशा ठरविणे सोईस्कर होईल. आम्ही केवळ गुरांसारखे आहोत. सरकार जसे हाकेल तसेच मार्गक्रमण करणे हे आमचे काम असल्याची सूचक प्रतिक्रिया एमएमआरसीएलच्या एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

टॅग्स :मुंबईमेट्रो