ठाणे : पुढच्या वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने बेरजेच्या राजकारणाला वेग आला असून आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या देवराम भोईर यांना ठाणे पालिकेच्या पोटनिवडणुकीत ‘अपक्ष’ असूनही बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली आहे. शिवसेनापुरस्कृत अपक्ष अशीच त्यांच्या उमेदवारीची चर्चा होती आणि निवडून येताच शाखेत जाऊन त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. भोईर यांना शिवसेनेतर्फे महापौरपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चाही लगेचच रंगली.
देवराम भोईर ठाण्याचे नवे महापौर होणार?
By admin | Published: April 02, 2016 1:08 AM