दुधाला एफआरपीचा कायदा करणार; मंत्रालयातील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 01:21 PM2021-06-26T13:21:21+5:302021-06-26T13:25:02+5:30

३५ रुपये दर तातडीने सुरू करा

Will enact FRP on milk; Decision in the meeting of the Ministry | दुधाला एफआरपीचा कायदा करणार; मंत्रालयातील बैठकीत निर्णय

दुधाला एफआरपीचा कायदा करणार; मंत्रालयातील बैठकीत निर्णय

Next

मुंबई/अकोले (जि. अहमदनगर) : ऊसाला लागू असलेल्या एफआरपीच्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा सरकार प्रयत्न करेल. याबाबतचा मसुदा तयार करण्याचे काम तातडीने सुरू केले जाईल, आठवडाभरात दुधाचे दर वाढतील असे आश्वासन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांच्या नेत्यांना दिले.

लाॅकडाऊनच्या काळात दुधाचे दर पडल्याने विविध संघटनांनी सध्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठक झाली.  आमदार सदाभाऊ खोत, अनिल बोंडे, किसान सभेचे अजित नवले, किरण लहमटे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. 
 डेअरीला दूध दिल्याबरोबर पावती देण्याच्या आणि पावतीवरील मजकूर अंतिम करण्याच्या सूचना देण्यात येतील. पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचेही यावेळी ठरले.

दुधाचे दर तातडीने वाढविले जाणार असल्याने व एफआरपीचा कायदा करण्याचे धोरण घेतले जाणार असल्याने लढ्याचे एक पाऊल पुढे पडले आहे.     - डॉ. अजित नवले,  राज्य सचिव माकप किसानसभा

Web Title: Will enact FRP on milk; Decision in the meeting of the Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध