बीकेसीत ५ रुपयांत ई-बाईक्सची सुविधा मिळणार; पर्यावरण संवर्धनासाठी MMRDA चा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 14:46 IST2020-08-31T14:45:58+5:302020-08-31T14:46:14+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सेवेच्या अंमलबजावणी करण्यासाठी युलू संस्थेसोबत ३१ जानेवारी २०२० मध्ये सामंजस्य करार केला होता.

बीकेसीत ५ रुपयांत ई-बाईक्सची सुविधा मिळणार; पर्यावरण संवर्धनासाठी MMRDA चा उपक्रम
मुंबई : इंधन बचत आणि पर्यावरण सवंर्धनासाठी वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात इलेक्ट्रिक बाइक्सचा प्रकल्प राबवण्यात आला असून सोमवारी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सेवेच्या अंमलबजावणी करण्यासाठी युलू संस्थेसोबत ३१ जानेवारी २०२० मध्ये सामंजस्य करार केला होता. सायकल सेवा फेब्रुवारीमध्ये चालू करण्याचे प्रस्तावित होते. पण कोविडमुळे सेवेची सुरुवात ३१ ऑगस्टपासून झाली.
सुरुवातीला सदर सेवेमध्ये अठरा स्थानके करण्यात आली असून वांद्रे रेल्वे स्थानकाच्या सर्वात जवळचे स्थानक येस. आर. ए. इमारती जवळ आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल.
सायकलचा वापर करण्यासाठी सुरुवातीला पाच रुपये हा अन-लॉकिंग शुल्क दर म्हणून व त्यानंतरचा वापर करण्यासाठी प्रत्येक मिनिटांसाठी रुपये दीड याप्रमाणे दर आकारण्यात येईल. सदर सेवेमध्ये प्रतिमहिना रिचार्ज सुविधा उपलब्ध असून वीस ते शंभर टक्के प्रमाणे सूट सुध्दा देण्यात येईल.