Join us

जुन्या इमारतींना न्याय देणार- विनोद घोसाळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 7:50 PM

मुंबई - मुंबईतील 19 हजार जुन्या इमारतींचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून तो सोडविणार असल्याची ग्वाही मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळाचे नवनिर्वाचित सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी दिली.आज घोसाळकर यांनी आपल्या पदाचा म्हाडा कार्यालयात कार्यभार स्वीकारला. आज 2011 पर्यंतच्या झोपड्यांना दिलासा मिळतो परंतु 50- 50 वर्षे जुन्या इमारतीचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.त्यासाठी आपण उद्यापासून या इमारतीना भेटी देणार आहेत त्यांची सुरुवात प्रभादेवी येथून करणार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.आज कार्यभार स्वीकारताना  महापौर प्रा.विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अर्जुन खोतकर,खासदार अरविंद सावंत,सुधार समिती सभापती विजय नाहटा,महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे,विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस,आमदार अनिल परब,सदा सरवणकर,सुनील शिंदे,प्रकाश सुर्वे, संजय शिरसाट,तृप्ती सावंत,मनिषा कायंदे, सुनील प्रभू,श्रद्धा जाधव,तृष्णा विश्वासराव,सुवर्णा करंजे,मिलिंद वैद्य,रिद्धी खुरसंगे,शुभदा गुडेकर,संध्या दोशी, योगेश भोईर, मोरजकर,मंगेश सातमकर,राजुल पटेल,हंसाबेन देसाई, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर. म्हाडाचे जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळपासून वांद्रे पूर्व,म्हाडा, 3 रा मजला,येथील त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.सर्वप्रथम शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दालनात प्रवेश केला यावेळी जय भवानी जय शिवाजी ,हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे च्या घोषणात परिसर दुमदुमला.त्यानंतर दालनात प्रवेश करताच शिवसेना प्रमुख व मासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

टॅग्स :मुंबईबातम्या