"...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:40 PM2022-12-07T12:40:59+5:302022-12-07T12:42:10+5:30

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणानं मी धिक्कार करतो, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.

will give strong replay to sanjay Raut warns Shambhuraj Desai over comment on cm eknath shinde | "...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

"...तर संजय राऊतांसोबत दोन हात करायचीही तयारी", शंभूराज देसाईंचा उघड इशारा!

Next

मुंबई-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी नाहक वक्तव्य केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणानं मी धिक्कार करतो, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सरकारला षंड असं संबोधल्याच्या मुद्द्यावर शंभुराज देसाई चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांनी जर अशी विधानं थांबवली नाहीत तर आमची दोन करण्याचीही तयारी आहे, असा उघड इशारा दिला आहे. 

"सीमावादावर केंद्रानं लक्ष द्यावं. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी करत आहेत. असं असताना षंड हा शब्द संजय राऊत यांनी आमच्या सरकारवर आणि आमच्यासाठी वापरला. संजय राऊत स्वत: कोण आहेत हे त्यांनी एकदा तपासून पाहावं. कारण ज्यांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचं समन्स कर्नाटकच्या कोर्टानं धाडलं ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ते तिथं जात नाहीत अशांनी आम्हाला षंड बोलू नये", असं शंभूराज देसाई म्हणाले. 

"संजय राऊत तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. तुम्हाला बाहेरचं वातावरण सूट होत नाहीत. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये त्यामुळे अशी वक्तव्य टाळावीत", अशा शब्दात शंभूराज देसाईंनी राऊत यांना इशारा दिला आहे. 

...तर दोन हात करण्याची तयारी
"छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली जी तुकडी बेळगावला गेली होती. त्यात एकनाथ शिंदे देखील होते. ४० दिवस त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या होत्या. त्यामुळे सीमावादावरुन चार तासही तुरुंगात न राहिलेल्या राऊतांना एकनाथ शिंदेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. संजय राऊतांनी यापुढे बडबड जर बंद केली नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत वेडंवाकडं बोलणं थांबवलं नाही तर जशास तसं उत्तर शिंदे साहेबांचे सैनिक दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर बोलणं थांबवावं आमची मंत्रीपदं, नेतेपद राहिली बाजूला पण शिंदे साहेबांबद्दल पुन्हा खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊत बोलले तर त्यांच्याशी दोन हात करण्याची आमची पण तयारी आहे", असं शंभूराज देसाई म्हणाले. 

आमच्यामुळे संजय राऊत खासदार
"एकनाथ शिंदेंच्या एका शब्दामुळे संजय राऊत आज खासदार आहेत. आम्ही जर शिंदे साहेबांचं ऐकलं नसतं तर संजय राऊतांच्या नावापुढे आज माजी खासदार असं असतं. आमच्या ५० आमदारांच्या मतावर संजय राऊत खासदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. शिंदे साहेबांनी चांगुलपणा दाखवला म्हणून ते खासदारपदी राहिले आहेत", असंही शंभूराज देसाई म्हणाले. 

Web Title: will give strong replay to sanjay Raut warns Shambhuraj Desai over comment on cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.