‘सलून सुरू करण्यास १ जुलैपर्यंत परवानगी न दिल्यास न्यायालयात जाणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 04:57 AM2020-06-25T04:57:13+5:302020-06-25T04:57:54+5:30

सरकारने १ जुलैपर्यंत सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा सलून पार्लर असोसिएशनने दिला आहे.

‘Will go to court if not allowed to start salon by July 1’ | ‘सलून सुरू करण्यास १ जुलैपर्यंत परवानगी न दिल्यास न्यायालयात जाणार’

‘सलून सुरू करण्यास १ जुलैपर्यंत परवानगी न दिल्यास न्यायालयात जाणार’

Next

मुंबई : कोरोना, लॉकडाऊनमुळे सलून गेले तीन महिने व्यवसाय बंद आहे. त्यामुळे सलून चालकांची उपासमार होत आहे. त्यांना घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. व्यवसाय बंद असला तरी दुकान भाडे तसेच लाईट बिल भरावे लागणार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे सरकारने १ जुलैपर्यंत सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा सलून पार्लर असोसिएशने दिला आहे.
सलून पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यावसायिक आणि सलून संघटनांमध्ये मंगळवारी चर्चा झाली. त्यामध्ये विमान सेवा, एसटी सेवा, दारू विक्रीसाठी जे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम आहेत, त्याप्रमाणेच नियम पाळून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली. एक तारखेपर्यंत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.
प्रत्येक सलून चालकास एक लाख रुपये रोख रक्कम अर्थिक मदत द्यावी व यापुढे व्यावसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी, सहा महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिल माफ करावे अशी अधिसूचना काढावी, सलून व्यावसाय सेवा क्षेत्रात मोडत असल्याने ५० लाखांचे विमा संरक्षण कवच मिळावे, अशा सलून चालकांच्या मागण्या आहेत.

Web Title: ‘Will go to court if not allowed to start salon by July 1’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.