Join us

बोरिवलीतून गोपाळ शेट्टी निवडणुकीच्या उतरणार रिंगणात ?

By मनोहर कुंभेजकर | Published: October 17, 2024 9:06 PM

गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबई-गेले काही दिवस बोरीवली विधानसभा मतदार संघात भाजप विद्यमान आमदार सुनील राणे यांच्या ऐवजी २०१४ ते २०२४ या काळात उत्तर मुंबईची खासदारकी भूषवणारे माजी खासदार गोपाळ शेट्टी पुन्हा बोरिवली तून येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप उतरवणार का ? अशी जोरदार चर्चा बोरिवलीच्या भाजप कार्यकर्ते आणि बोरिवलीकरांमध्ये सुरू झाली आहे.

बोरिवली विधानसभेत २०१९ पासून भाजपाचे सुनील राणे आमदार आहेत.मात्र २००४ ते २०१४ या काळात दोन वेळा आमदार पद भूषवणारे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना यंदा उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत.पियुष गोयल हे केंद्रात मोदी यांच्या मंत्री मंडळातील पहिल्या पाचातील मंत्री आहेत.गोयल हे प्रामुख्याने शनिवार ,रविवारी उत्तर मुंबई मतदार संघात उपस्थित असतात. मात्र आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता आणि पुढील पाच वर्षे उत्तर मुंबई वर भाजपाची घट्ट पकड राखण्यासाठी  येथून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी अनेक भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

भाजपाशी एकनिष्ठ असलेल्या पक्षातील बोरिवलीतील सुमारे ४० -५० पदाधिकाऱ्यांनी बंद लिफाफ्यात आपल्याला कोण उमेदवार पाहिजे अशा क्रमाने ३ उमेदवाराचे नाव लिहून देण्याची प्रक्रिया अलीकडेच अवलंबिली होती. बोरीवली विधानसभेच्या साठी देखील निरिक्षक म्हणून माजी केंद्रीय राज्य मंत्री व माजी खासदार कपिल पाटील यांच्या देखरेखीखाली  ही प्रक्रिया बोरीवलीत पार पडली.त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देणार याकडे येथील भाजप कार्यकर्ते व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :गोपाळ शेट्टी