‘डीजीं’चे आणखी एक पद वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:21 AM2017-12-09T05:21:48+5:302017-12-09T05:21:58+5:30

होमगार्ड विभागाचे अप्पर महासंचालक संजय पांडे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने नव्या वर्षात होणाºया अतिवरिष्ठ अधिकाºयांच्या पोस्टिंगची समीकरणे बदलणार आहेत

 Will increase one more category of 'DGM' | ‘डीजीं’चे आणखी एक पद वाढविणार

‘डीजीं’चे आणखी एक पद वाढविणार

Next

जमीर काझी
मुंबई : होमगार्ड विभागाचे अप्पर महासंचालक संजय पांडे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार बढती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने नव्या वर्षात होणाºया अतिवरिष्ठ अधिकाºयांच्या पोस्टिंगची समीकरणे बदलणार आहेत. गृह विभागाने महासंचालक पदासाठी तीन महिन्यांपूर्वी पात्र ठरविलेल्या अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनाही बढती द्यावयाची झाल्यास महासंचालक (डीजी) दर्जाचे आणखी एक पद निर्माण करावे लागणार आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर मुंबईच्या आयुक्तपदासाठी दावेदार असलेले ठाण्याचे आयुक्त परमबिरसिंग यांची प्रतीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तर संजय बर्वे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाºयांतून वर्तविली जात आहे. पांडे यांना दीड महिन्याच्या आता ‘डीजी’ची पदोन्नती द्यावयाची असल्याने पोलीस महासंचालक सतीश माथूर वगळता अन्य चौघा वरिष्ठ अधिकाºयांपैकी एकाकडे ‘एसीबी’ची धुरा सोपवून रिक्त रहाणाºया पदावर त्यांना बढती दिली जाईल किंवा त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचे एखाद्या ‘साईड पोस्टिंग’च्या पदाचा दर्जा महासंचालकाचा केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज्य सरकारने दहा वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय बदलून पांडे यांची दोन वर्ष आठ महिन्यांचा सेवा कालावधी असाधारण रजा (डायस नॉन) करण्याच्या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्या. विजया ताहिलरमाणी व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारवर गंभीर आक्षेप नोंदवत पूर्वीप्रमाणेच त्यांची सेवा ज्येष्ठता गृहित धरण्याचे आदेश दिले. डीजींची सहा पदे मंजूर असून त्यापैकी ५ पदे भरलेली तर एसीबीची एक पोस्ट रिक्त आहे. पांडे हे १९८६ च्या आयपीएस तुकडीचे असून त्यांच्या बॅचचे एसीपी यादव यांना नऊ महिन्यांपूर्वी बढती मिळाली असून त्यांच्याकडे ‘एफएसएल’ची धुरा आहे.

Web Title:  Will increase one more category of 'DGM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस