सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागतील का?, अजूनही ५ निकाल बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:31 AM2017-09-19T05:31:04+5:302017-09-19T05:31:20+5:30

सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबई विद्यापीठाचे अजूनही उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपलेले नाही. सोमवार सायंकाळपर्यंत विद्यापीठाचे ५ निकाल लागणे बाकी असल्यामुळे आता सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

 Will it still take effect by September? | सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागतील का?, अजूनही ५ निकाल बाकी

सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागतील का?, अजूनही ५ निकाल बाकी

Next


मुंबई : सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू होऊनही मुंबई विद्यापीठाचे अजूनही उत्तरपत्रिका तपासणीचे काम संपलेले नाही. सोमवार सायंकाळपर्यंत विद्यापीठाचे ५ निकाल लागणे बाकी असल्यामुळे आता सप्टेंबरअखेरपर्यंत तरी निकाल लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयात सुनावणीत आता मुंबई विद्यापीठाला पुन्हा फटकारले जाणार का, याविषयी चर्चा सुरू आहे.
प्राध्यापक हाताने उत्तरपत्रिकांची तपासणी करतात, एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी उत्तरपत्रिका जातात. या सर्व प्रकारात निकालांमध्ये गोंधळ होतो. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर होत आहे. हा सर्व गोंधळ टाळून लवकर निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठात यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत आणण्यात आली, पण या पद्धतीचा बोजवारा उडला आहे.
उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने निकालाला काही प्रमाणात खीळ बसली आहे. पण, यातून मार्ग कधी आणि कसा निघणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे विद्यापीठातर्फे तपासणीचे काम सुरू असून, लवकरच निकाल जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे.
या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला जाण्याच्या मार्गात अडथळे आले. यामुळे हे प्रकरण थेट न्यायालयात गेले आहे. न्यायालयानेही विद्यापीठाला एकदा सुनावले आहे. आता पुन्हा एकदा सुनावणी आल्यावरही विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आता न्यायालयात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई विद्यापीठात निकालांचा गोंधळ संपत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आता विद्यार्थी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. विद्यापीठ निकाल जाहीर करत नसल्यामुळे विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.
>पडल्यामुळेच फाटल्या उत्तरपत्रिका
विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅनिंगसाठी नेताना परीक्षा भवनात दुसºया मजल्यावरुन पडल्यामुळे फाटल्याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली होती. उत्तरपत्रिका फाटल्यामुळे स्कॅनिंगला तांत्रिक अडचणी येत असल्याची चर्चा याआधी रंगली होती. पण, मुंबई विद्यापीठाने यावर पडदा टाकला. असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  Will it still take effect by September?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.