ठाण्यात ड्रोन कॅमेरे ठेवणार फेरीवाल्यांवर पाळत
By admin | Published: January 14, 2017 12:59 PM2017-01-14T12:59:03+5:302017-01-14T13:03:22+5:30
ठाणे स्टेशन परिसरासह विविध महत्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांचा असलेला वावर रोखण्यासाठी आता ड्रोन कॅमे-यांची मदत घेण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १४ - ठाणे स्टेशन परिसरासह विविध महत्वाच्या ठिकाणी फेरीवाल्यांचा असलेला वावर रोखण्यासाठी आता ड्रोन कॅमे-यांची मदत घेण्यात येणार आहे. ड्रोन कॅमे-यांच्या साहाय्याने फेरीवाल्यांवर पाळत ठेवून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
शन परिसरातील फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करूनही नागरिकांच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत याकडे लक्ष वेधत कारवाईच्यावेळी फेरीवाले पळून जात असतील तर त्यावर ड्रोन कॅमे-याने पाळत ठेवून कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी बैठकीत दिले. यावेळी जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत महत्वाच्या ठिकाणी जिथे फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होतो किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो त्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे लावून फेरीवाल्यांनर कारवाई करा असे सांगितले आहे