खारेगाव पारसिक रेल्वे स्थानक साकारणार?
By admin | Published: December 9, 2014 11:06 PM2014-12-09T23:06:39+5:302014-12-09T23:06:39+5:30
पारसिक, खारेगाव रेल्वे स्थानकाबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
Next
ठाणो : पारसिक, खारेगाव रेल्वे स्थानकाबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या खारेगाव पारसिक रेल्वे स्थानकाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याणचे खासदार डॉ. o्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण जिल्हा लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक उमेश पाटील, महिला विभागप्रमुख लता पाटील, युवा सेनेचे सरचिटणीस राकेश पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या रेल्वे मुख्यालयात सूद यांची भेट घेऊन कळवा, खारेगाव, पारसिकनगर परिसरातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणा:या प्रश्नांबाबत महाव्यवस्थापकांशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी शिष्टमंडळाला हे आश्वासन दिले. सूद यांच्याशी झालेल्या चर्चेत कळवा रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी आणि पारसिक, खारेगाव येथील वाढत्या लोकसंख्येमुळे हे स्थानक काळाची गरज असल्याचे सांगितले. कोपर, नाहूर, ओशिवरा स्थानकांना रेल्वे मंत्रलयाकडून परवानगी दिली जाते. मग खारेगाव, पारसिक स्थानकाबाबत दुजाभाव का, असा सवाल शिष्टमंडळाने या वेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणो खारेगाव रेल्वे फाटकाजवळील नियोजित उड्डाणपूल, पारसिक रेतीबंदरजवळील रेल्वे मार्ग ओलांडताना होणारे वाढते अपघात लक्षात घेता त्या ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी या शिष्टमंडळाने केली. त्या वेळी आपण स्वत: या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देऊन पाठपुरावा करू, असे आश्वासन सूद यांनी दिले. कळवा ते सीएसटी अशी उपनगरी रेल्वे सेवा सुरू करणो शक्य आहे का, याबाबत तांत्रिक विभागातर्फे माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही सूद यांनी या वेळी सांगितले. कळवा पूर्व ते पश्चिम भागाला जोडणा:या स्कायवॉकबाबत ठाणो महानगरपालिकेने उचित प्रस्ताव पाठविला तर रेल्वे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ देण्यास तयार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)