मुंबई : ब्रिटीश व्हॉईसरॉयच्या कौन्सिलमध्ये देशाचे उर्जामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी उर्जा विभागाची पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातील आंबेडकरवादी कार्यकर्त्याकडे राज्यातील उर्जा विभागाची जबाबदारी देण्यात आली. हा मी माझा सन्मान समजतो. महाराष्ट्राला ऊर्जावान करण्यासाठी काम करणार, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.शेतकरी व सामान्य माणसाला किफायतशीर दरात मुबलक वीजपुरवठा उपलब्ध करण्याबरोबरच ग्रामीण व शहरी उद्योजकता वाढीला माझे प्रोत्साहन असेल. सोबतच वीज निर्मितीमध्ये राज्याला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी नवीन वीज निर्मिती प्रकल्प निर्माण करण्यावर प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला ऊर्जावान करणार - नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 5:22 AM