मुंबई/नवी दिल्ली - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज झाली. या बैठकीत राज्यातील जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडीमधील मित्रपक्षांसाठी काही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आघाडीमध्ये मनसेला स्थान दिले जाणार नसल्याचे काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये संभाव्य आघाडी आणि जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच या बैठकीत महाराष्टातील विधानसभेच्या 61 जागा निश्चित झाल्याचे वृत्त आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 25 जागा लढवतील. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येतील, असे निश्चित करण्यात आले. मात्र आघाडीमध्ये मनसेला सामावून घेण्यात येणार नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. मनसेच्या आघाडीतील समावेशाबाबत विचारले असता काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मनसेला आघाडीत घेतले जाणार नाही, असे सांगितले.
मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 10:02 PM