‘मुंबई आय’ची जागा बदलणार?, जागा निश्चितीसह आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:24 AM2020-06-27T01:24:38+5:302020-06-27T01:24:42+5:30

आता मुंबई आयसाठी योग्य जागेचा शोध करण्यासोबतच त्या प्रकल्पाची आर्थिक, तांत्रिक आणि अभियांत्रिकीय सुसाध्यता तपासण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

Will Mumbai I be relocated ?, Financial and technical feasibility test with location confirmation | ‘मुंबई आय’ची जागा बदलणार?, जागा निश्चितीसह आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता चाचणी

‘मुंबई आय’ची जागा बदलणार?, जागा निश्चितीसह आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता चाचणी

googlenewsNext

संदीप शिंदे
मुंबई : ८०० फूट उंचीवरून मुंबईचे विहंगम दर्शन पर्यटकांना करून देण्यासाठी लंडन आयच्या धर्तीवर वांद्रे रेक्लमेशन येथे मुंबई आय प्रकल्प उभारणीचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. मात्र, प्रकल्पासाठीची जागा अपुरी असून त्यात बदल करावा, अशी मागणी करीत नामांकित कंपन्यांनी या कामासाठी काढलेल्या स्वारस्य देकारांना पुरेसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर आता मुंबई आयसाठी योग्य जागेचा शोध करण्यासोबतच त्या प्रकल्पाची आर्थिक, तांत्रिक आणि अभियांत्रिकीय सुसाध्यता तपासण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
२००६ सालापासून हा महत्वाकांक्षी प्रकल्प चर्चेत आहे. महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी विशेष स्वारस्य दाखविल्याने प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्यासाठी एमएमआरडीएने एक्स्प्रेशन आँफ इंटरेस्ट मागविले होते. परंतु, त्या निविदांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकल्पासाठी राखून ठेवलेली जागा अपुरी आहे. तिथे प्रकल्पाची उभारणी केल्यास वाढणा-या वर्दळीमुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण होईल. त्यामुळे या जागेत बदल करावा अशी प्रमुख मागणी निविजापूर्व बैठकीत काही निविदाकारंनी पुढे रेटली होती. १५ मे रोजी या निविदा प्रक्रियेची मुदत संपली.
मात्र, आता सुसाध्यता अहवाल तयार करूनच या प्रकल्पाचे पुढील काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. प्रकल्पासाठी जागा निश्चिती करणे, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, कामासाठी आवश्यक असलेल्या निविदा प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासणे अशा अनेक आघाड्यांवर अहवाल पात्र निविदाकाराकडून सादर होणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे या निविदांमध्ये या प्रकल्पासाठी सुरवातीला निवडण्यात आलेल्या जागाचे कुठेही उल्लेख नाही. तसेच, जागा निश्चितीची जबाबदारीसुध्दा पात्र निविदाकाराच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
>प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रक्रिया आवश्यक
प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएमआरडीएने कामांसाठी जानेवारी महिन्यात निविदा (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) प्रसिद्ध केल्या होत्या. त्या कामांसाठी दोन ग्लोबल टेंडर प्राप्त झाले होते. अशा स्वरूपाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याने त्या निविदांचे मूल्यांकन करण्यात आले.
त्यानंतर कामांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक सुसाध्यता तपासण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी
माहिती देण्यात आली आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी ही प्रक्रिया क्रमप्राप्त आहे.

Web Title: Will Mumbai I be relocated ?, Financial and technical feasibility test with location confirmation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.