Join us

नववर्षात सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 3:49 PM

Mumbai Local : सर्वसामान्य प्रवाशांकडून लोकल ट्रेन केव्हा सुरू केली जाणार असा सवाल केला जात आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी मोठी माहिती दिली.

ठळक मुद्देगेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा आहेत बंदराज्यात अद्यापही नव्या स्ट्रेनचा रुग्ण नसल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदेंही बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता तीदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु  त्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आता अनलॉक प्रक्रियेदरम्यान महिला प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर सर्वांसाठीच लोकल सेवा केव्हा सुरू होणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. "पोस्ट न्यू ईयर कोरोना रुग्णांची संख्या किती होईल हे आधी पाहावं लागणार आहे. जर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेल्वे सेवा पूर्ववत करण्याबाबत विचार करतील. ते नक्कीच याबाबत सकारात्मक राहतील. मुंबईचीरेल्वे ही लाईफलाईन आहे. ती बंद असल्यानं सामान्य माणसाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे याची कल्पना आहे," असं राजेश टोपे म्हणाले. राज्यात नव्या स्ट्रेनचा रूग्ण अद्याप नाही"मी स्वत: डॉ. वर्षा पोतदार यांच्याशी चर्चा केली आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचे जे नमूने त्यांच्याजवळ चाचणीसाठी आले आहेत त्यामध्ये नव्या स्टेनचा विषाणू दिसून आलेला नाही. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या नमून्यांमध्ये एकही नव्या स्ट्रेनची केस महाराष्ट्रात आढळलेली नाही. चेन्नई, दिल्लीत अशाप्रकारचे रुग्ण आढळले आहेत. परंतु महाराष्ट्रात आलेल्या लोकांपैकी कोणालाही सुदैवानं नव्या विषाणूची लागण झालेली नाही, हे एनआयव्हीच्या वर्षा पोतदार यांनी सांगितलं आहे," अशी माहिती टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

टॅग्स :राजेश टोपेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकमुंबईरेल्वेमुंबई लोकल