Join us

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा फुटणार नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 5:58 AM

आज ३८ हजार कोटींचा धमाका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली असून, शिंदे गट व भाजपने आघाडी घेतली आहे. याचीच एक झलक म्हणून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मुंबईत ३८ हजार कोटी रुपये मूल्याच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही यावेळी वितरित होणार आहे.

या प्रकल्पांचे लोकार्पण

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका २ अ म्हणजेच दहिसर पूर्व - डी. एन. नगर या ६ हजार ४१० कोटींच्या प्रकल्पासह मेट्रो मार्ग ७ म्हणजे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा ६ हजार २०८ कोटींचा मेट्रो प्रकल्प.
  • पालिकेचे २० नवीन आपले दवाखाने

 

या प्रकल्पांचे भूमिपूजन

  • १७ हजार १८२ कोटींचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प- पालिकेच्या तीन रुग्णालयांचे १ हजार १०८ कोटींचे बांधकाम.
  • ६,०७९ कोटी 
  • रुपयांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १ हजार ८१३ कोटींच्या पुनर्विकासाचे काम.

 

काँक्रिटीकरण...

  • ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल.
  • या कामांसाठी अंदाजे ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या कामांतर्गत शहर भागात ७२ किमी.
  • लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत, तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
  • यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी. लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
टॅग्स :नरेंद्र मोदीपंतप्रधानमुंबई