राहुल गांधींना राज्यात फिरू देणार नाही - देवीदासी संघटनाध्यक्षांची घोषणा
By Admin | Published: February 3, 2017 03:14 PM2017-02-03T15:14:13+5:302017-02-03T15:17:42+5:30
दलित विरोधी नेत्यांची हकालपट्टी करत नाही, तोपर्यंत गांधींना मुंबईसह राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा देवदासी संघटनेचे अध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विलास रूपवतेंनी दिला.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - महाराष्ट्र निराधार व देवदासी संघटनेचे अध्यक्ष व मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विलास रूपवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दलित विरोधी नेत्यांची हकालपट्टी करत नाही, तोपर्यंत गांधींना मुंबईसह राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा रुपवते यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
रुपवते म्हणाले की, देवदासी महिलांनी चिल्लर जमा करून अर्ज भरण्यास पाठिंबा दिला होता. १३३ क्रमांकमधून अर्ज भरला होता. मात्र बाहेरच्या प्रभागातील उमेदवाराला तिकीट दिले. शाहिर सचिन माळी याच्या सुटकेसाठी केलेल्या आंदोलनामुळे काँग्रेसने ही गळचेपी केल्याचा रुपवते यांचा आरोप आहे.
काँग्रेसला सोडचिट्टी दिली तरी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे रुपवते यांनी सांगितले.
राहुल गांधींचे प्रतिकात्मक श्राद्ध!
देवदासी महिलांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व हळद-कुंकू अर्पण करून प्रतिकात्मक श्राद्ध घातले. शिवाय दोन दिवसांत निरुपम यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.