वीज कापू देणार नाही; सरकारने निर्णय जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:33+5:302021-01-21T04:07:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वीज पुरवठा खंडित केला, तर त्यास विरोध होईल, असा ...

Will not cut off electricity; The government should announce the decision | वीज कापू देणार नाही; सरकारने निर्णय जाहीर करावा

वीज कापू देणार नाही; सरकारने निर्णय जाहीर करावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने वीज पुरवठा खंडित केला, तर त्यास विरोध होईल, असा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिला आहे. त्याचे कारण हे आहे, की सरकारनेच आम्हाला असे आश्वासन दिले होते की, वीज बिलात काही ना काही सवलत देऊ. त्यामुळे सवलतीचा निर्णय जाहीर करा, असेही होगाडे यांनी सांगितले.

वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. यावर प्रताप होगाडे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकारने आम्हाला पहिल्यापासून आश्वासन दिले होते की, काही ना काही सवलत देऊ. ऊर्जामंत्र्यांनीही मान्य केले होते की, जोवर सवलतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत वीज कापणार नाही. असे असताना वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम दुर्दैवी आहे. सरकारने अशी पावले उचलता कामा नयेत. सरकारने वीज पुरवठा खंडित केला तर त्यास आम्ही विरोध करू. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे त्यास जोरदार प्रतिकार होईल. राज्यातही प्रतिकार होईल. शिवाय संघटनांशी बोलून आम्ही पुढील गोष्टी ठरवू. आम्ही ऑक्टोबरपासूनची बिले भरण्यास तयार आहोत. आम्ही वसुलीच्या विरोधात नाही. मात्र, एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानची वीज बिले भरणार नाही. या सहा महिन्यांच्या वीज बिलात आम्हास सवलत हवी आहे. ऑक्टोबरपासूनची वीज बिले तुम्ही स्वीकारा. ऑक्टोबरपासून आम्ही सवलत मागत नाही. सरकार मात्र सवलत देत नाही, असेही होगाडे यांनी सांगितले.

राज्यात कोविडमुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिली आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तत्काळ सोडविण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. दुसरीकडे मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खासगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी वीज आयोगाची परवानगी घेऊन सप्टेंबरमध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबईत चालू केली. थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला.

Web Title: Will not cut off electricity; The government should announce the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.