मुंबई: अॅड. चंद्रशेखर आझाद यांना हॉटेल सोडण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलेला नाही. मात्र, मुंबईभरात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अटकही करण्यात आले आहे, त्यांची सुटका करण्यात आल्याशिवाय मनाली हॉटेलमधून बाहेर पडणार नाही असे आझाद यांनी पोलिसांना सांगितल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
त्यानुसार मुंबईभरात झालेल्या अटक सत्राची माहिती ऍड आझाद हे फोनवरून घेत असल्याचेही या अधिकाऱ्याने नमुद केले. कार्यकर्त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे कोर्ट ऑर्डर त्यांना दाखविण्यात यावेत, अशी मागणी आझाद यांनी केली आहे.