कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:35 AM2024-06-07T10:35:14+5:302024-06-07T10:37:46+5:30

प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वासही गगराणी यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

will not tolerate attacks on employees warning of mumbai municipal commissioner bhushan gagrani | कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा

कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा

मुंबई :  पवईत अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या पालिका कर्मचारी आणि पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गंभीर दखल घेतली असून, असे हल्ले कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जखमी झालेल्या पालिका कर्मचारी, पोलिसांची गगराणी व सह पोलीस आयुक्तांनी विचारपूस केली. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वासही गगराणी यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

पवई येथे कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येत होती. पवई गाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने पालिका प्रशासनास दिले होते. 

१) महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार या झोपडपट्टीधारकांना यापूर्वी देखील नोटीस दिल्या होत्या. तसेच, पालिका अधिनियमातील कलम ४८८ तरतुदीनुसार, या झोपड्यांच्या कब्जेदारांना १ जून रोजी कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या. 

२) ४८ तासांच्या आत स्वत:हून ही अतिक्रमणे न तोडल्यास अतिक्रमणे हटविण्यात येतील, असे नोटीसमध्ये नमूद केले होते. त्यानुसार अतिक्रमण तोडण्याची कारवाई सुरू असताना स्थाानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली.

३) या घटनेत पालिकेचे ५ अभियंते, ५ मजूर व त्यासोबत १५ पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. यापुढे देखील कारवाई सुरू राहील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: will not tolerate attacks on employees warning of mumbai municipal commissioner bhushan gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.