Join us

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 8:43 AM

भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली आहे.

मुंबई- भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली आहे. दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी भाजपवरील ही नाराजी व्यक्त केली. काल दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

'मी भाजपची आहे, पण पक्ष माझा थोडी...'; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

जयंत पाटील म्हणाले, आमचे अनेक सहकारी भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे त्या लोकांना कुठे बसवायचे हा प्रश्न राहिला आहे. त्यामुळे निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर बोलताना पाटील म्हणाले, जर आणि तर या प्रश्नाला कधीच उत्तर देऊ नये. ज्यावेळी जर होईल त्यावेळी आम्ही तरचे उत्तर देऊ. 

'शिंदे गटात गेलेले कार्यकर्ते माझी परवानगी घेऊन गेले आहेत. शिंदे गटातील कांहींनी मला सांगितलं, म्हणाले जाऊन थोडा निधी घेतो, काम करतो आणि परत आपल्या पक्षात येतो, असंही पाटील म्हणाले. 

'मी भाजपची आहे, पण पक्ष माझा थोडी...';

गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. आता पुन्हा एकदा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल एका कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी भाजपवरील ही नाराजी व्यक्त केली. काल दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. यावेळी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडाच आहे. भीती वाटणं हे आमच्या रक्तातच नाही. आम्ही कुणाला घाबरतच नाही, काही मिळालं नाहीतर मी ऊसतोडीसाठी जाईन, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं. पंकजा मुंडे  यांच्या या वक्तव्याने त्या भाजपने नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.   

'भाजप खूप मोठा पक्ष आहे, मी फक्त त्यामध्ये काम करते. गोपीनाथ मुंडे यांनी मोठं काम केलं. मुंडे साहेबांनी अनेक आमदार, खासदार बनवले. यामुळे आता सरकार स्थापन करण्यापर्यंत प्रवास केला. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे मी कधीही कुणासमोर झुकणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.    

टॅग्स :पंकजा मुंडेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटील