Join us  

‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 5:25 AM

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदीय राजकारणात असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. तसेच आपण स्वत: निवडणुकीला इच्छुक असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, असे स्पष्ट मत अमित ठाकरे यांनी मांडले.

हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

मनसेचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची सोमवारी सकाळी बैठक झाली. विधानसभा निवडणुकीची तयारी आणि रणनीती, उमेदवारांची निवड आदी मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. अमित ठाकरे यांनी यावेळी पक्षातील नेते, पदाधिकारी यांनी निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदीय राजकारणात असणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. तसेच आपण स्वत: निवडणुकीला इच्छुक असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.

अमित ठाकरे यांचा मतदारसंघ कोणता?

गेल्या तीन वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले अमित ठाकरे यांच्याकडे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. राज्यभरात त्यांनी विद्यार्थी संघटनेचे जाळे निर्माण केले आहे. त्यासोबतच राज्याच्या विविध शहरांत सभा, संमेलनाला उपस्थित राहून ते पक्षबांधणी करत आहेत. त्यामुळे अमित ठाकरे कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार याची चर्चा सुरू झाली आहे.

मनसेचे तीन उमेदवार याआधीच जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांची शिवडी विधानसभेतून तर,

पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे आणि लातूर ग्रामीणमधून राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

टॅग्स :मनसेअमित ठाकरेराज ठाकरे