मालमत्ता कराचे लक्ष्य यंदा हुकणार? महापालिकेची उत्पन्नाची बाजू कमकुवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 07:18 AM2018-02-01T07:18:27+5:302018-02-01T07:18:41+5:30
जकात कर रद्द झाल्यामुळे उत्पन्नासाठी महापालिकेची मालमत्ता करावर मदार आहे. मात्र, उत्पन्नाचे हे दुसरे मोठे स्रोत या आर्थिक वर्षातही सलग दुसºयांदा कमाईचे लक्ष्य चुकणार आहे.
मुंबई : जकात कर रद्द झाल्यामुळे उत्पन्नासाठी महापालिकेची मालमत्ता करावर मदार आहे. मात्र, उत्पन्नाचे हे दुसरे मोठे स्रोत या आर्थिक वर्षातही सलग दुसºयांदा कमाईचे लक्ष्य चुकणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाची बाजू कमकुवत होऊन त्याचा फटका विकासकामांना बसण्याची शक्यता आहे.
पालिकेचा आर्थिक कणा असलेला जकात कर १ जुलै २०१७ रोजी रद्द होऊन, वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. जकात करातून दरवर्षी महापालिकेला सरासरी ७ हजार उत्पन्न मिळत होते. कमाईचा हा स्रोत बंद झाल्यामुळे महापालिकेने उत्पन्नाचे दुसरे मोठे स्रोत असलेल्या मालमत्ता करावर लक्ष केंद्रित केले. मात्र, सन २०१७-२०१८चे लक्ष्य गाठण्यासाठी १,८८० कोटी रुपये कमी पडत आहेत.
सन २०१७-२०१८साठी महापालिकेने ५ हजार २०० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, जानेवारी महिन्यापर्यंत ३ हजार ३२० कोटी रुपये मालमत्ता कराच्या स्वरूपात पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
तर सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत ३ हजार ३८० कोटी रुपये वसूल झाले होते. त्या वर्षीही ३१ मार्च २०१७ पर्यंत ४ हजार ८४५ कोटी रुपये जमा झाल्याने, ५ हजार २०० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य हुकले होते.
महापालिकेचा सन २०१६-२०१७चा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा होता, तर २०१७-२०१८चा अर्थसंकल्प २५ हजार १४१ कोटींचा होता. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच वास्तवदर्शी अर्थसंकल्प प्रशासनाने मांडल्यामुळे, अर्थसंकल्पात थेट ११ हजार कोटी रुपयांनी घट झाली होती.
राज्य सरकारने दिला ६०० कोटींचा धनादेश
च्मालमत्ता कर थकविणाºयांना पालिका स्मरणपत्र पाठविते. त्यानंतरही मालमत्तेची थकबाकी न भरल्यास, त्या सदनिकेचा अथवा सोसायटीचा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो किंवा त्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात येते.
च्शेवटच्या दिवशी नागरिक मालमत्ता कर भरण्यासाठी धावपळ करीत असतात, असे दिसून आले आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च २०१७ रोजी एका दिवसात ३७५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यामुळे पुढील २ महिन्यांत लक्ष्य गाठू, असा विश्वास कर निर्धारक व संकलन विभागाच्या अधिकाºयांना वाटत आहे.
च्सन २०१७-२०१८ आणि सन २०१६-२०१७ मध्ये मालमत्ता करातून ५ हजार २०० कोटी जमा करण्याचे पालिकेचे लक्ष्य होते. यापैकी ३१ मार्च २०१७ पर्यंत ४,८४५ कोटी तर जानेवारी २०१८ पर्यंत ३,३२० कोटी रुपये उत्पन्न जमा झाले आहे.
च्जकात उत्पन्नातून गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेने ७,२०० कोटी रुपये उत्पन्न जमा केले होते. मात्र, जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्यामुळे उत्पन्नाचे ६,९५० कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
च्महापालिकेला होणाºया नुकसानाची भरपाई राज्य सरकार करीत आहे. ६०० कोटी रुपयांचा धनादेश राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षी पालिकेला दिला.