राहुल गांधींचा अपमान करणाऱ्यांशी आघाडी करणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:35 PM2018-10-04T21:35:19+5:302018-10-04T21:37:25+5:30

राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. राफेल करारात चोरी झाल्याचा आरोपही केला.

Will Rahul Gandhi lead the insulted people ?; Congress questions Prakash Ambedkar | राहुल गांधींचा अपमान करणाऱ्यांशी आघाडी करणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल

राहुल गांधींचा अपमान करणाऱ्यांशी आघाडी करणार का?; प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सवाल

Next

मुंबई : राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. राफेल करारात चोरी झाल्याचा आरोपही केला. अशावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र पंतप्रधान मोदींना क्लीन चिट देत राहुल गांधींना खोटे पाडले. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षाचा अपमान करणा-या पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार का, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी उपस्थित केला. 
भारिपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी एमआयएमसोबतची युती, राफेल विमान खरेदी, रूपयाची घसरण आदी विषयांवर भाष्य केले. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना खोट ठरविणा-यांसोबत आघाडी करायची का याचा निर्णय काँग्रेस नेत्यांना घ्यावा, असे सांगत आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. काँग्रेससोबत आघाडी व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. परंतु काँग्रेस नेत्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्यासोबत ज्या दोन बैठका झाल्या त्यात आम्ही मांडलेल्या प्रस्तावावरही काँग्रेसने त्यांचे म्हणणे कळविले नाही. २००४ पासून राज्यातील २२ जागांवर काँग्रेस पराभूत होत आहे. त्यापैकी १२ जागा आम्हाला द्या, असा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. शिवाय, कोणत्या १२ जागा द्यायचा याचा निर्णयही काँग्रेसने घ्यावा असे आम्ही सुचविले होते. यावर त्यांच्या नेत्यांनी चर्चा करून कळवतो असे सांगून आजतागत  फोनसुद्धा केला नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयाची घसरण होत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. देशातील एकूण ५० टक्के संपत्ती ३ लाख ३० हजार ४०० कुटुंबांकडे आहे. भाजपाने उद्योगपतींचा छळ सुरू केला असून उद्योगांना ब्लॅकमेल केल जात आहे. त्यामुळे जवळपास ७५ हजार कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. आपल्याला अटक होऊ नये, कायद्याच्या कचाट्यात अडकू नये या भितीपोटी भारतातून पळ काढणा-या या कुटुंबांनी आपली संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून आलेल्या रूपयाचे डॉलरमध्ये रूपांतर करण्याचा सपाटा लावल्याने डॉलरची मागणी वाढल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे स्थलांतरीत होणारी कुटुंब हिंदू आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास  या ३ लाख कुटुंबांपैकी किती कुटुंबे भारतात राहतील ही देखील शंका असल्याचे आंबेडकर म्हणाले.

‘एमआयएम’ची साथ सोडणार नाही. 
काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या आमच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्ही ‘एमआयएम’ला सोबत घेतल्यावर मात्र काँग्रेस नेते सल्ले देत आहे. एमआयएम बाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये. केरळमध्ये काँग्रसने मुस्लिम लीगची सोबत केली होती, याचा विसर पडू देऊ नका, असे सांगतानाच एमआयएमची साथ सोडणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will Rahul Gandhi lead the insulted people ?; Congress questions Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.