Join us  

'साताऱ्याचा हाच पाऊस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:10 AM

सातारा लोकसभा मतदारसंघात आज श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले

ठळक मुद्देराजू शेट्टींनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, राजू शेट्टींनी हातात बैल धरलेला दिसत आहे. तर, वरुण कोसळणाऱ्या पावसाच्या धारा त्यांचे अंग भिजवत आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या अंगावरील कपडेही पावसाच्या पाण्यात

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांना आणि देशातील जनतेला पाहायला मिळाले. पावसामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना सभा रद्द कराव्या लागल्या. मात्र, शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात आपण इतर नेत्यांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. साताऱ्याच्या पावसाचा करिश्मा महाराष्ट्राने पाहिलाय. एक सभेत वातावरण फिरलं अन् राजकारणच बदललं. आता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही साताऱ्यातील पावसात भिजून आंदोलन केले.

सातारा लोकसभा मतदारसंघात आज श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले. या सभेसाठी हजारो लोक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांचा हा उत्साह पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. पवारांचे हे रूप पाहून सर्वजण भारावले. कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात या पावसाने इतिहास रचला. श्रीनिवास पाटील यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांचा पराभव करत, साताऱ्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. 

'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार राजू शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीचा मोर्चा काढला. केंद्र सरकारने दूध भुकटी व इतर दुग्धजन्य पदार्थांची आवक थांबवावी, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा तसेच राज्य शासनाने गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, या मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत.

साताऱ्यातील या मोर्चादरम्यान पाऊस आल्याने राजू शेट्टी यांनी भरपावसात भिजत आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या दरवाढीच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. राजू शेट्टींनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, राजू शेट्टींनी हातात बैल धरलेला दिसत आहे. तर, वरुण कोसळणाऱ्या पावसाच्या धारा त्यांचे अंग भिजवत आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या अंगावरील कपडेही पावसाच्या पाण्यात भिजल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच, शेट्टी यानी या व्हिडिओसोबत एक प्रश्न उपस्थित केला आहे. ''साता-याच्या पावसाने राज्याच्या राजकारणाला न्याय दिला असेल ! तर आजचा हाच साता-याचा पाऊस दुध उत्पादक शेतक-यांना न्याय देईल का?'', असे शेट्टी यांनी म्हटले. 

टॅग्स :राजू शेट्टीसातारा परिसरपाऊसशरद पवार