Join us

कलिना, बीकेसी, कुर्ल्यात पावसाचे पाणी साचणार?; बफर झोन निश्चित करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 11:44 AM

मुंबई महापालिकेने मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोईसर  नद्यांच्या परिसरात बफर झोन आखला आहे.

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मिठी नदीच्या काठावर एमएमआरडीएने त्यांच्या कार्यक्षेत्रात बफर झोन निश्चित न केल्यामुळे बीकेसी, कुर्ला आणि कलिना परिसरात गेल्या  दोन दशकांपासून पावसाचे पाणी साचण्याची समस्या कायम राहणार आहे. नदीच्या काठावर १० मीटर क्षेत्रात बफर झोन निश्चित करणे आवश्यक होते.

मुंबई महापालिकेने मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोईसर  नद्यांच्या परिसरात बफर झोन आखला आहे. मिठी नदी ही पालिका आणि एमएमआरडीए या दोन यंत्रणांच्या कार्यक्षेत्रात येते. या नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याची कामे या यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. पालिकेने त्यांच्या हद्दीत बफर झोनची निर्मिती केली आहे. कलिना येथील टॅक्सिमन कॉलनी आणि कुर्ला एलबीएस मार्ग या दोन भागांत अतिवृष्टी झाली की पूर परिस्थिती निर्माण होते. गेली दोन दशके हे चित्र कायम आहे. कुर्ला मिठी नदीचा परिसर तर पावसाळ्यात धोकादायक बनतो. 

आणखी अडथळा येऊ शकतो

अतिवृष्टीच्या काळात  बफर झोनची भूमिका मोठी असते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी एकप्रकारे बफर  झोन बेसिनचे काम करतात . बफर झोन निश्चित न केल्यामुळे या क्षेत्रात वाटेल तशी बांधकामे करता येईल. त्यामुळे बांधकामात वाढ होऊन पाण्याचा निचरा होण्यास आणखी अडथळा येऊ शकतो, याकडे वॉच डॉग फाउंडेशनने  एमएमआरडीएचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :नदीमुंबई