Join us

राणा जगजितसिंह पाटील भाजपात जाणार? अजित पवारांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 3:42 PM

राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.

ठळक मुद्देराणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.राणा पाटील हे भाजपमध्ये येणार या फक्त बातम्याच असून त्यात तथ्य नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

मुंबई - लोकसभेतील यशाप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच, किती दिवस विरोधात राहायचे, असा प्रश्न करत राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसापासून उठल्या आहेत. राष्टवादीचे नेते अजित पवार आणि राणा पाटील यांचे संबंध ताणले गेल्याने ते भाजपमध्ये नक्की जाणार अशी कुजबुज सुरु आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील आमदार आहेत. 

राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. मात्र, या बातम्याच असून तसे काहीही नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. एखाद्या आमदाराने उमेदवारीसाठी अर्ज भरला नाही म्हणजे ते पक्षासोबत नाहीत, असा अर्थ काढू नका, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले मागील काही काळामध्ये मलासुद्धा विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे अर्ज सादर करता आला नव्हता. राजेश टोपे, राणा पाटील यांच्या बाबतीतही अशा घटना घडलेल्या होत्या. त्यामुळे माध्यमाता येणाऱ्या बातम्या शंभर टक्के खऱ्या नाहीत, असे म्हणत अजित पवार यांनी शिवेंद्रराजेंसह राणाजगजितसिंह पाटील हेही राष्ट्रवादीसोबतच असल्याचे सूचवले आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना फुलस्टॉप मिळाला, असे म्हणता येईल. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि 

राणा पाटील हे भाजपमध्ये येणार या फक्त बातम्याच असून त्यात तथ्य नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी म्हटले, एका स्थानिक वेब पोर्टलशी बोलताना सांगितले. राणा पाटील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे मला तरी माहित नाही. पक्षश्रेष्ठीने अजून तरी यासंदर्भात विचारणा केलेली नाही, या बातम्या कोण पेरत आहे, हेही मला माहित नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार का ? यासंदर्भात राणा पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीमती अर्चना पाटील यांनीही या बातम्यात तथ्य नसल्याचे सांगितले. तसेच, असं काहीही ठरलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :अजित पवारउस्मानाबाद जिल्हा परिषदउस्मानाबादराष्ट्रवादी काँग्रेस