आरे कॉलनीत आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:57 PM2021-05-27T14:57:07+5:302021-05-27T15:13:21+5:30

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Will rebuild the tribal world in Aarey Colony; Assurance given by Minister of State Prajakta Tanpure | आरे कॉलनीत आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिलं आश्वासन

आरे कॉलनीत आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिलं आश्वासन

googlenewsNext

मुंबई- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या मुंबईच्या आरे कॉलनी पवई, पेरूवाडीतील आदिवासी पाड्यांची राज्याचे नगरविकास तथा शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच पाहणी केली. आरेतील पाड्यांत आदिवासी बांधवांच्या अनेक घरांचे चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. आदिवासींचा हा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा  करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आदिवासी बांधवांना सर्वोतोपरी शासकीय मदत देण्याचे जाहिर केले. तसेच राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आदिवासींना मदत देण्याचे आश्वासित केले. या पाहणी दोऱ्यात प्रकल्प अधिकारी, तलाठी तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांची उपस्थिती होती. 

आरे कॉलनीत आदिवासींच्या अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. यावेळी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी पवई व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मदतीचे आदेश दिले.

Web Title: Will rebuild the tribal world in Aarey Colony; Assurance given by Minister of State Prajakta Tanpure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.