Join us

वास्तुविशारदांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविणार

By admin | Published: December 30, 2015 1:18 AM

मुंबईतील नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाकडे ११ वास्तुविशारदांनी प्राथमिक आराखडे सादर केले आहेत. म्हाडाकडे

मुंबई : मुंबईतील नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाकडे ११ वास्तुविशारदांनी प्राथमिक आराखडे सादर केले आहेत. म्हाडाकडे सादर झालेले हे आराखडे म्हाडाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. यापैकी तीन आराखड्यांची निवड सरकार करणार असून जानेवारी महिन्यात चाळींच्या पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन तयार होणार आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी २४पैकी १३ वास्तुविशारदांची निवड म्हाडाने केली.