क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:11 AM2018-05-10T05:11:55+5:302018-05-10T05:11:55+5:30

शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने मुंबईत तीन क्लस्टर विद्यापीठे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून तसा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा)कडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

Will send proposals for the creation of cluster universities - Vinod Tawde | क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविणार - विनोद तावडे

क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविणार - विनोद तावडे

Next

मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने मुंबईत तीन क्लस्टर विद्यापीठे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून तसा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा)कडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व
तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.
विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज रूसाच्या राज्य कौन्सिलची बैठक झाली. या वेळी रूसाचे राज्य प्रकल्प संचालक मीता राजीवलोचन यांच्यासह रूसा कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते. तीन क्लस्टर विद्यापीठांच्या प्रस्तावामध्ये एचआर कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, केसी कॉलेज आणि बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीटीटीसी) या महाविद्यालयांचे एक क्लस्टर असेल. तर, के. जे. सोमय्या कॉलेज आॅफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, के.जे. सोमय्या कॉलेज आॅफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, एस. के. सोमय्या कॉलेज आॅफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स या तीन महाविद्यालयांचे दुसरे
क्लस्टर विद्यापीठ तसेच एल्फिन्स्टन कॉलेज, इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, सिडनहॅम कॉलेज आॅफ कॉमर्स, शासकीय बीएड कॉलेज या शासकीय महाविद्यालयांचे तिसरे अशा तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव रूसाकडे पाठविण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. या तीनही क्लस्टर विद्यापीठांचे प्रस्ताव मंजूर झाले तरी येथील प्राध्यापकांचे अनुदान हे शासनामार्फतच सुरू राहणार आहे. या क्लस्टर विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिक
सुधारणा होईल. तसेच विद्यार्थ्यांना चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिमचाही लाभ मिळू शकेल, त्यामुळे विद्यार्थ्यांना
आपला अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतील, असेही तावडे यांनी  सांगितले.

गुणवत्ता उंचावणार
रूसाच्या माध्यमातून राज्यातील
शासकीय महाविद्यालये, विद्यापीठ
यांच्या
बळकटीसाठी तसेच
शैक्षणिक गुणवत्ता
उंचावण्यासाठी
प्रयत्न करत
असल्याचे विनोद
तावडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will send proposals for the creation of cluster universities - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.